Dr. Manmohan Singh RIP : डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव काँग्रेस कार्यालयात दाखल
Former Prime Minister Dr. Manmohan Singh RIP : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी नवी दिल्लीतील निगमबोध घाटावर पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी 26 डिसेंबर रोजी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले.
डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती गुरुवारी संध्याकाळी खालावली, त्यानंतर त्यांना दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले. तिथे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग 2004 ते 2009 आणि 2009 ते 2014 पर्यंत दोनदा पंतप्रधानपद त्यांनी भूषवले. या काळात मनमोहन सिंग यांनी देशाची अर्थव्यवस्था आणखी मजबूत केली होती.

शनीवारी अंत्यसंस्कार, सात दिवस दुखवटा
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून शुक्रवारी सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी पूर्ण सरकारी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.












Click it and Unblock the Notifications