भूकंपाच्या डेंजर झोनमध्ये भारत! जमीन फाटतेय, वैज्ञानिकांनी वर्तवला हिमालयात शक्तिशाली भूकंपाचा धोका!

Earthquake News : भारताची शान हिमालय पर्वतासंबंधी भुवैज्ञानिकांनी मोठे भाष्य केले आहे. ही माहिती अनेकांना चिंतेत टाकणारी असून हिमालयाखाली जमीनीच्या होणाऱ्या हालचालीवर वैज्ञानिकांनी भाष्य केले आहे. मोठा भूकंप होऊ शकतो आणि हाहाकार माजू शकतो असे वैज्ञानिकांचा तर्क आहे.

हिमालय पर्वताच्या कुशीत अनेक भुभागावर मानवी जीवन आहे, या मानवी जीवनाला धोका असल्याचे आणि भारतातील काही राज्यांना धोका असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. आगामी काळात मोठ्या भूकंपाचा धोका येऊ शकतो.

Earthquake News

किती रिश्टर सकेलचा भूकंप असेल?

वैज्ञानिकांनी दावा केला की, हिमालयाच्या खाली भुभागात हालचाली होऊन जवळपास 8 रिश्टर स्केलचा भूकंप येऊ शकतो. ही केवळ शक्यता नाही तर कधी न् कधी होईलच असाही त्यांचा दावा आहे. मात्र, हे कधी होईल हे मात्र त्यांनी सांगितलेले नाही.

अलिकडे भुकंप का होतो आणि हिमालयाच्या भुभागाखालील हालचालीसंदर्भात अनेक अभ्यास केले जात आहेत तर काही संदर्भही भुकंपासंदर्भात पुढे आलेले आहेत, आता अमेरिकी भुवैज्ञानिकांनी केलेले भाष्य भारत आणि हिमालयालगत असलेल्या राष्ट्रांसाठी चिंतेत टाकणारा आहे.

काय आहे वैज्ञानिकांचा इशारा?

मनी कंट्रोलने आपल्या वृत्तात हिमालयातील भुकंपाविषयी माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, अमेरिकी भू-वैज्ञानिक रोजर बिलहम यांनी अलिकडे एका इंटरव्ह्युव्हमध्ये म्हटले की, भारत प्रत्येक शतकात तिबेटकडे दोन मीटरने घसरत आहे. उत्तरी भाग सहज नाही तर घर्षणामुळे शेकडो वर्षांपर्यंत अटकून राहतो जेव्हा हे घर्षण अचानक तुटते तेव्हा जमीन मोठ्यापातळीवर फाटते आणि भूकंप जाणवतो.

भारतात शक्तिशाली भुकंपाचा धोका आहे का?

भारतीय प्लेटचा दाट आणि जड भाग पृथ्वीच्या आतील आवरणात समाविष्ट होत आहे. यामुळेच भारतीय प्लेटमध्ये खोल आणि उभ्या क्रॅक तयार होत आहेत, यामुळे भविष्यात मोठे भूवैज्ञानिक बदल होऊ शकतात तसेच या भुभागात अंतर्गत हालचाली होत राहतात ज्या भविष्यात गंभीर होऊ शकतात, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

कोणत्या राज्यांना असू शकतो धोका?

दिल्ली आणि कोलकाता ही दोन शहरे धोकादायक फाॅल्ट लाईनवर वसलेली आहेत आणि हिमालयापासून दिल्ली जवळपास तीनशे ते साडेतीनशे किमी दूर आहे. त्यामुळे जर अशी काही घटना घडली तर हिमालयाच्या आसपासची राज्य आणि दिल्लीत मोठे नुकसान होऊ शकते.

हेही वाचा : एका तासांत झाले चार भुकंप; भारतातील 'या' जिल्ह्यातील लोक सैरावैरा पळाले; किती झाले नुकसान?

हेही वाचा : चिंताजनक बातमी : म्यानमारपेक्षा भयानक भुकंप चीन,भारतात होणार; शास्त्रज्ञांना काय वाटते भिती? वाचा

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+