Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

चिंताजनक बातमी : म्यानमारपेक्षा भयानक भुकंप चीन,भारतात होणार; शास्त्रज्ञांना काय वाटते भिती? वाचा

म्यानमारमध्ये काही दिवसांपूर्वी ७.९ रिश्टर स्केलचा भुकंप झाला होता. त्यात तीन हजारांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले होते. आता त्यापेक्षा जास्त शक्तीशाली भुकंप चीन व भारताच्या पूर्वेकडेही होऊ शकतो, असा अंदाज चीनी शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. चिनी भूकंपशास्त्रज्ञांच्या एका पथकाने या शक्तिशाली भूकंपांच्या मालिकेचा इशारा दिला आहे. त्यासाठी गेल्या १५० वर्षांतील भुकंपांचा अभ्यास करण्यात आला आहे. या बातमीने भारताचेही टेन्शन वाढले आहे.

Chinese scientists claim about earthquake

नेमका काय आहे दावा?

चिनी शास्त्रज्ञांनी भूकंपाच्या चक्रांना पृथ्वीच्या परिभ्रमणातील चढउतारांशी जोडणारे नमुने ओळखले आहेत. पृथ्वीच्या टेक्टोनिक प्लेटमधील ताण धोकादायक टप्प्यात प्रवेश करत आहे का, असे प्रश्न त्यांच्या आभ्यासानंतर उपस्थित होऊ लागले आहेत. बीजिंग भूकंप संस्थेचे वरिष्ठ अभियंता झू होंगबिन यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या टीमने हा आभ्यास केलाय. त्यासाठी १५० वर्षांहून अधिक काळातील भूकंपीय डेटाचे विश्लेषण करण्यात आले. चीन आणि आसपासच्या प्रदेशांमध्ये सहा प्रमुख भूकंप सक्रिय काळ या टीमने शोधून काढल्याचा दावा करण्यात आला आहे. पृथ्वीचे तणाव क्षेत्र आता ईशान्येकडे सरकू शकते, असा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे.

भुकंप नेमका कोठे होऊ शकतो?

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, सध्या भूकंपाच्या सक्रिय कालावधीच्या नवजात टप्प्यात चीनचा काही भाग प्रवेश करत आहे. नैऋत्य चीनमधील लाँगमेनशान फॉल्टच्या बंद भागांमध्ये वाढत्या दाबाकडे या अभ्यासात लक्ष वेधण्यात आले आहे. २००८ मध्ये सिचुआनमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाला कारणीभूत ठरलेला हाच मुद्दा होता, असेही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. भुकंपाचा हाच धोका पूर्व हिमालयीन सिंटॅक्टिककडे म्हणणजेच उत्तर भारताकडे सरकत आहे का, असा प्रश्नही यानिमित्ताने पुढे आला आहे.

भारताचीही वाढली चिंता?

भूकंपाचा प्रत्येक कालावधी पृथ्वीच्या परिभ्रमण गतीतील बदलाशी संबंधित असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सध्या ईशान्येकडील वाढत्या टेक्टोनिक दाबामुळे ते आधीच उच्च-जोखीम असलेल्या क्षेत्रांपैकी एकामध्ये असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या टीमने जो दावा केला आहे तो चीनमधील सहा क्षेत्रांबाबत असला तरी हा टेक्टोनिक दाब भारताकडेही सरकत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच भारताचेही टेन्शन वाढले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+