एका तासांत झाले चार भुकंप; भारतातील 'या' जिल्ह्यातील लोक सैरावैरा पळाले; किती झाले नुकसान?

जगातील वेगवेगळ्या देशांत भुकंपाचे धक्के सुरुच आहेत. आज रविवारी सकाळी भारतासह म्यानमार, ताजिकिस्तानच्या काही भागात भुकंपाचे धक्के जाणवले. विशेष म्हणजे अवघ्या एका तासांच्या अंतरात चार भूकंप झाले. सलगच्या चार धक्क्यांमुळे मध्य आणि दक्षिण आशिया देशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. हिमालयीन शहरांपासून ते मध्य आशियाई शहरांपर्यंत अनेक रहिवासी राहत्या घरांतून बाहेर पडले.

Earthquake tremors

भारतात मंडी येथे भुकंप

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या अहवालानुसार (NCS) हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात सकाळी ९ वाजता भुकंपाचा पहिला धक्का जाणवला. तेथे ५ किमी खोलीवर ३.४ तीव्रतेचा भूकंप नोंदला गेला. भूकंपाचे केंद्र ३१.४९° उत्तर, ७६.९४° पूर्व येथे होते. भूकंपाचा हा धक्का जरी किरकोळ मानला जात असला तरी, तो रहिवाशांना जाणवण्याइतका तीव्र होता. भुकंपाचे धक्के जाणवू लागल्यानंतर मंडी जिल्ह्यातील नागरीक हे घरांतून बाहेर पळाले. या भुकंपात आतापर्यंत कोणतीही दुखापत किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

म्यानमारमध्ये पुन्हा भुकंप

त्यानंतर लगेचच मध्य म्यानमारमधील मेकटिलाजवळ ५.५ तीव्रतेचा भूकंप झाला, असे यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने म्हटले आहे. २८ मार्च रोजी झालेल्या ७.७ तीव्रतेच्या विनाशकारी भूकंपानंतर हा भूकंप सर्वात शक्तिशाली भूकंपांपैकी एक होता. त्यावेळी ३,६०० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आणि हजारो जखमी झाले होते. मार्चमधील भुकंपामध्ये हादरलेल्या मंडाले आणि नायपिताव या दोन्ही शहरांमध्ये हा भूकंपाचा धक्का पुन्हा जाणवला.

म्यानमारमधील लोक रस्त्यावर

हा भूकंप इतका जोरदार होता की, लोक इमारतींमधून बाहेर पळाले. काही घरांच्या छतांना नुकसान झाल्याचेही वृत्त आहे. कोणतीही नवीन जीवितहानी झालेली नाही, परंतु आधीच दुःख आणि नुकसानाचा सामना करणाऱ्या देशात भूकंपामुळे चिंता वाढली आहे.

ताजिकिस्तानमध्ये दोन धक्के

ताजिकिस्तानमध्ये सकाळी ९.५४ मिनिटांनी ६.१ तीव्रतेचा भूकंप झाला. ज्याचा मूळ अंदाज ६.४ होता. भूकंप १० किमी खोलीवर होता. त्याचे केंद्रबिंदू ३८.८६°उत्तर, ७०.६१°पूर्व होते, ज्यामुळे तो सकाळचा सर्वात मोठा भूकंप ठरला. जवळच्या शहरांमधील लोकांनी जोरदार भूकंपाचे धक्के जाणवल्याचे वृत्त आहे. खबरदारी म्हणून काही दुकाने आणि शाळा रिकामी करण्यात आल्या आहेत. त्यानंतर, सकाळी १०.३६ वाजता, पुन्हा १० किमी खोलीवर ३.९ तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला, ज्यामुळे परिसरात भूकंपाच्या वाढत्या हालचालींबद्दल चिंता वाढली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+