2 वर्षे आणि 166 बैठका, असा तयार झाला संविधानाचा मसुदा, जाणून घ्या खास गोष्टी आणि उद्देश?
Constitution Day 2024 : अनेक महापुरुष, क्रांतिकारी आणि देशप्रेमींनी आपले रक्त सांडल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य इतके सहज मिळाले नाही. स्वातंत्र्यासह प्रजासत्ताक होणेही तितकेच महत्वाचे होते. त्यासाठी संविधान लिहिण्यात आले. हा दिवस समस्त भारतीयांसाठी प्रजासत्ताक दिनाएवढाच महत्वाचा आहे.
दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो. संविधान दिन हा केवळ एक दिवसाचा उत्सव नसून आपल्या देशाच्या सर्वात महत्त्वाच्या दस्तऐवजाचे स्मरण करण्याचा दिवस आहे. आपल्याला कोणते अधिकार आहेत आणि देशाप्रती आपण कोणती कर्तव्ये पार पाडली पाहिजेत हे सांगते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेच्या सदस्यांनी केलेले परिश्रम आज आपल्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम करतात. संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी अंतिम करण्यात आले आणि 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आले. या विशेष दिवसाचा इतिहास आणि महत्त्व याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

संविधान दिनाचा इतिहास
भारतीय संविधान दिनाला अधिकृतरीत्या 2015 मध्ये मान्यता देण्यात आली. नागरिकांना संविधानिक मूल्यांची जाणीव करून देणे हा हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष असलेले डॉ. भीमराव आंबेडकर यांचे विशेष स्मरण या दिवशी केले जाते.
हेही वाचा : Samvidhan divas 26 november : आज भारतीय संविधान दिवस, जाणून घ्या काय आहे इतिहास आणि महत्व?
संविधान निर्मितीची सुरुवात
- संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली.
- डॉ. सच्चिदानंद सिन्हा हे अंतरिम अध्यक्ष
- झाले आणि नंतर डॉ. राजेंद्र प्रसाद यांची स्थायी अध्यक्ष म्हणून निवड झाली.
- संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवस लागले.
- या कालावधीत 166 बैठका झाल्या.
हेही वाचा : कायदा 'आंधळा' नाही! न्यायदेवतेच्या डोळ्याची पट्टी हटली! हातात तलवारीऐवजी आता संविधान
संविधानाबाबत महत्वाच्या गोष्टी
- भारतीय संविधान हे जगातील सर्वात लांब लिखित संविधान आहे.
- सुरुवातीला त्यात 395 अनुच्छेद, 22 भाग आणि 12 अनुसुची होत्या.
- प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी इंग्रजी आणि हिंदीमध्ये ते हस्तलिखित केले होते.
- संविधानाचे डिझाईन शांतिनिकेतनचे कलाकार नंदलाल बोस यांनी तयार केली होती.
हेही वाचा : जगातील सर्वात उत्तम संविधान भारताचे, ते कोणीही बदलू शकत नाही - देवेंद्र फडणवीस
संविधानाचे महत्त्व
भारतीय राज्यघटना हा केवळ कायदेशीर दस्तावेज नसून तो देशाचा आत्मा आहे. यात न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यासारख्या महत्त्वाच्या तत्त्वांचा समावेश आहे. संविधान दिन हा त्या महान नेत्यांना आणि विचारवंतांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस आहे ज्यांनी आपल्या देशाला लोकशाही बनवण्यासाठी कठोर परिश्रम केले.
संविधानाची मुख्य उद्दिष्टे
न्याय: प्रत्येक व्यक्तीला समान न्याय प्रदान करणे.
स्वातंत्र्य: विचार, धर्म आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य.
समानता: सर्व नागरिकांना समान अधिकार.
बंधुभाव : बंधुभावाची भावना वाढीस लावणे.
26 नोव्हेंबर हा दिवसच का निवडला?
26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली. 26 जानेवारी 1950 ही तारीख पूर्ण स्वराज दिनाचा वर्धापन दिन असल्याने त्याच्या अंमलबजावणीसाठी निवडण्यात आली. राज्यघटनेचे हिंदीत भाषांतर करून ते लोकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी मधल्या वेळेचा उपयोग करण्यात आला.
संविधान दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान निर्मात्यांच्या योगदानाचे स्मरण करणे. संविधानाचा आत्मा आणि मूल्ये समजून घेणे. तरुण पिढीला त्याचे महत्त्व पटवून देणे.
संविधानाशी संबंधित काही खास गोष्टी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्षपद भूषवले. 42 व्या घटना दुरुस्ती (1976) अंतर्गत 10 मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आली. 2002 मध्ये अकरावे कर्तव्य जोडण्यात आले. संविधानाची मूळ प्रत आजही संसदेच्या ग्रंथालयात जतन करण्यात आली आहे.












Click it and Unblock the Notifications