Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

जगातील सर्वात उत्तम संविधान भारताचे, ते कोणीही बदलू शकत नाही - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis on Indian Constitution : जगातील सर्वात उत्तम संविधान हे भारताचे आहे, ते कोणीही बदलू शकणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि शासन आपल्या दारी योजना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

घटनारक्षण प्रथम कर्तव्य

जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध यांच्या विचारावर चालणारा जपानसह आशियातील अनेक देश विकसित झाले आहेत. जगातील सर्वात उत्तम संविधान हे भारताचे असून, ते कोणीही बदलू शकणार नाही, असे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र व राज्य शासन संविधानानुसारच काम करत आहे. केंद्र शासनाच्या नेतृत्वात राज्य शासनाने केंद्र शासनाकडून चैत्यभूमीची जागा परत घेतली आहे. तसेच लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे घर लिलावात विकत घेतले आहे. शिवाय जपानमधील कोयासन विद्यापिठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला असल्याचे त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis

2024 पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवायचे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पानुसार 2024 पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवायचे आहे. या विकास प्रक्रियेत महिलांचाही तेवढाच महत्त्वपूर्ण सहभाग राहणार असल्यामुळे केंद्र व राज्य शासन पुरस्कृत महिला सक्षमीकरणाच्या विविध योजनांचा त्यांनी उल्लेख केला. त्यामध्ये मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांसह लखपती दिदींचा आवर्जून उल्लेख केला. या योजना बंद पडणार नाहीत, याची ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

सक्षमीकरणात महाराष्ट्र प्रथम -आदिती तटकरे

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात 1 कोटी 60 लाखांपेक्षा जास्त महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून दिल्याचे सांगत लवकरच अडीच कोटीवर महिलांना लाभ मिळेल, असे महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या या योजनेतून राज्यातील महिलांच्या विकासात मोठा बदल घडून येणार असून, महिलांच्या विकासात कोणतीही कसर राहणार नाही. महिलांना समाजात सन्मानाचे स्थान मिळवून देण्याचे काम राज्य शासनाने केले आहे. राज्यात बालकांच्या नावापुढे आईचे नाव लावणारे हे देशातील पहिले राज्य असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याच्या सक्षम नेतृत्वात महिला व बालविकास विभागांतर्गंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिक प्रभावी ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+