स्क्रीन टाइम वाढतोय? वेळीच सावध व्हा, अन्यथा तुम्हाला येईल आंधळेपण, जाणून घ्या- कशी घ्यावी काळजी
Computer Vision Syndrome Symptoms : सध्याचे युग हे संगणकाचे युग म्हटले जाते. मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप, डेस्कटॉप आणि टॅबलेटसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरामुळे स्क्रीन टाइमचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. त्यातून निर्माण झालेली 'कम्प्युटर आय सिंड्रोम' ही समस्या आज काल वाढत आहे. स्क्रीन टाइमचा डोळ्यांवर होणारा दुष्परिणाम, त्याची कारणे आणि त्यावर काय उपाययोजना कराव्यात यावर आपण जाणून घेणार आहोत..!
कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम म्हणजे काय?
आधुनिक युगात संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोणतेही काम आता संगणकाच्या मदतीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. संगणकाच्या अपरिहार्य कारणामुळे आपल्या डोळ्यांवरचा ताण मात्र सातत्याने वाढत असल्याने त्याच्या अतिवापरामुळे डोळ्यांच्या अनेक समस्या निर्माण होतात, त्यालाच कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम (सीव्हीएस) असे म्हणतात.
या अवस्थेमुळे डोळ्यांना कायमस्वरूपी हानी होत नाही; पण संगणकाचा वापर तितक्या सहजतेने करणे शक्य होत नाही. आधीपासून चष्मा असेल आणि त्याचा वापर न करता संगणकाचा वापर केला, तर संगणकाशी संबंधित डोळ्यांच्या समस्या अधिक प्रमाणात उद्भवू शकतात. परंतु, सातत्याने जर स्क्रीन टाईमिंगमध्ये वाढ होत असेल तर तुम्ही आंधळे देखील होऊ शकता. तुमची नजर कमी होईल. त्यामुळे काय काळजी घ्यावी, यावर जाणून घेऊया...!

संगणकामुळे दृष्टीवर कसा परिणाम होतो?
संगणकावर काम करताना आपले डोळे सतत कशावर तरी केंद्रित होत असतात. डोळ्यांची सतत हालचाल होत असते आणि आपण बघत असलेल्या गोष्टींशी ते जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. कॉन्ट्रास्ट, फ्लिकर आणि ग्लेअर या संगणकाच्या स्क्रीनच्या घटकांमुळे संगणकावर काम करणे हे पुस्तक वाचणे किंवा वर्तमानपत्र वाचण्यापेक्षा त्रासदायक होते. अत्याधिक स्क्रीन टाइममुळे डोळ्यांच्या स्नायूंवर ताण पडतो. स्क्रीनकडे सलग पाहिल्यामुळे डोळ्यांच्या पापण्यांचा स्नायू ताणले जातात.
कम्प्युटर व्हिजन सिंड्रोमचे काय लक्षणे आहेत..।!
- डोळ्यावर ताण आणि लालसरपणा
- संगणकाच्या वापरानंतर धूसर किंवा दुहेरी दृष्टी
- डोळे कोरडे पडणे
- लालसरपणा, चुरचुरणे, डोकेदुखी
- मानेत किंवा पाठीत वेदना पापण्यांची उघडझाप कमी होणे
वेळीच काळजी काय घ्यावी, काय उपाययोजना कराव्यात..!
• काम करताना दर 20 मिनिटांनी 20 सेकंदांसाठी 20 फूट दूर असलेल्या गोष्टीकडे पाहावे. त्यामुळे तुमच्या डोळ्यांना आराम मिळतो आणि ताण कमी होतो.
• स्क्रीनचा ब्राइटनेस डोळ्यांना आरामदायी असावा. खूप तेजस्वी किंवा खूप कमी प्रकाशामुळे डोळ्यांवर ताण पडतो.
• कॉम्प्युटर मॉनिटरची जागा डोळ्यांपासून साधारणतः पंचवीस इंचांवर असावी आणि डोळ्यांच्या आडव्या स्तरात त्याचे अंतर खालून सहा इंच असावे.
• डोळ्यांमध्ये काही समस्या जाणवली, तर त्वरित नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. योग्य तपासणीमुळे समस्यांचे निदान होऊ शकते.
• झोपेच्या किमान एक तास आधी स्क्रीनचा वापर बंद करावा. यामुळे निळ्या प्रकाशाचा मेंदूवर होणारा परिणाम कमी होतो आणि झोप चांगली येते.












Click it and Unblock the Notifications