Navratri 2025 fasting diet : नवरात्रीच्या उपवासात 'हे' 4 पदार्थ टाळा, आरोग्यासाठी ठरु शकतात धोकादायक
Navratri 2025 fasting diet health tips in marathi these 4 foods to avoid : देशात आणि महाराष्ट्रात नवरात्रीची धुम आहे, दुर्गा माता देवीचे मंदिरं सजली असून विद्यूत रोषणाईही केली गेली. घराघरातही घटस्थापना झाली असून २२ सप्टेंबर २०२५ पासून सुरु झालेल्या पवित्र शारदीय नवरात्रीनिमित्त उपवास व्रत असंख्य भाविक भक्त करतात. नऊ दिवस चालणाऱ्या या उपवासाचे महत्त्व केवळ धार्मिक नाही, तर ते शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरणासाठीही आहे.
उपवास काळात असंख्य भाविक फलाहार करतात, पण नकळत काही अशा गोष्टी खातात, ज्यामुळे उपवासाचा उद्देशच सफल होत नाही. अनेकदा 'फलाहार' म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या काही गोष्टी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असू शकतात आणि त्यामुळे उपवासही सुटतो. जर तुम्ही ९ दिवस उपवास करत असाल आणि त्याच वेळी निरोगी राहायचे असेल, तर खालील ४ गोष्टी टाळणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

१. तळलेले बटाटा चिप्स:
नवरात्रीत बटाटा चिप्स आणि तळलेले पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. ते चवीला चांगले असले तरी, ते 'डीप फ्राय' केलेले असल्याने त्यात अनहेल्दी फॅट्स आणि कॅलरीचे प्रमाण खूप जास्त असते. अशा गोष्टी वारंवार खाल्ल्याने वजन वाढू शकते आणि पचनक्रियेत बिघाड होऊ शकतो.
२. साबुदाणा खिचडी:
साबुदाणा हे उपवासाचे 'एनर्जी फूड' मानले जाते, पण त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण खूप जास्त आणि फायबरचे प्रमाण खूप कमी असते. जर तुम्ही रोज जास्त प्रमाणात साबुदाणा खिचडी खाल्ली, तर रक्तातील साखरेची पातळी (ब्लड शुगर लेव्हल) वाढू शकते. शिवाय, यामुळे लवकर भूक लागते आणि तुम्ही जास्त खाऊ शकता.
३. पॅकेटमधील उपवासाची नमकीन:
उपवासासाठी खास तयार केलेली पॅकेटमधील नमकीन खाणे सोपे वाटले तरी, ते आरोग्यासाठी योग्य नाही. या पॅकेटमधील पदार्थांना जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी त्यात रासायनिक पदार्थ (केमिकल्स) वापरले जातात, जे शरीराला हानी पोहोचवू शकतात. तसेच, हे पदार्थ तळलेले असल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते.या शिवाय ते साध्या मिठातील असू शकतात, उपवासासाठी खास सेंदीमीठ वापरले जाते, ते अनेकदा पॅकेज्ड वस्तूंमध्ये वापरले जात नाही.
४. बटाट्याचे अतिरिक्त सेवन:
अनेक लोक उपवासाच्या काळात बटाट्याचे विविध पदार्थ खातात-कधी तळलेले बटाटे, कधी टिक्की, तर कधी बटाट्याचे रायते. बटाट्यामध्ये स्टार्चचे प्रमाण अधिक असल्याने त्याचे जास्त सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते, ज्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते आणि तुम्हाला थकल्यासारखे वाटू शकते.
या नवरात्रीत उपवासाचा खरा उद्देश लक्षात ठेवून, शक्यतो ताजे फळ, भाज्या आणि नैसर्गिक पदार्थ खाण्यावर भर द्या. यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील आणि उपवासाचा आध्यात्मिक लाभही मिळेल.
(टीप: हा लेख केवळ सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणत्याही आरोग्यविषयक समस्येसाठी किंवा आहार बदलासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)












Click it and Unblock the Notifications