Bigg boss च्या फायनलमध्ये काळजाला भिडणारा क्षण! धर्मेंद्र यांच्या आठवणीने सलमान खानला कोसळले रडू!
Salman Khan Breaks Down in Tears Remembering Dharmendra : बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र यांच्या निधनामुळे अभिनेता सलमान खान यांना झालेला धक्का संपूर्ण देशाला 'बिग बॉस १९' च्या मंचावर दिसला. मनोरंजन विश्वातील या पितृतुल्य व्यक्तीच्या आठवणीने सलमान खान इतका भावूक झाला की, राष्ट्रीय टेलिव्हिजनवर तो अक्षरशः ढसाढसा रडला.
ज्या व्यक्तीला धर्मेंद्र आपले 'तिसरे पुत्र' मानत होते, त्याच पित्याच्या आठवणीने सलमानचे मन भरून आले. वडिलांचा वाढदिवस आणि लगेच दुसऱ्या दिवशी आईचा वाढदिवस असतानाच, धर्मेंद्र यांची २४ नोव्हेंबरची निधन तारीख आठवून तो पूर्णतः शोकाकुल झाला. 'सनी आणि बॉबीने त्यांचे अंतिम संस्कार खूप चांगल्या प्रकारे केले,' असे म्हणत अश्रूंच्या धारांमध्ये त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आणि या दोन कुटुंबातील अतुट नात्याची जाणीव करून दिली.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनामुळे अभिनेता सलमान खान यांना मोठा धक्का बसला आहे. सलमान खानच्या टीव्ही रिअॅलिटी शो 'बिग बॉस १९' चा अंतिम सोहळा (Finale) ७ डिसेंबर रोजी पार पडला. या सोहळ्यात धर्मेंद्र यांच्या आठवणीत सलमान खानला आपले अश्रू आवरले नाहीत.
आईच्या वाढदिवसाचा संदर्भ देत झाला भावुक
धर्मेंद्र यांचे निधन २४ नोव्हेंबर रोजी झाले. या तारखेचा संदर्भ देत सलमान खान भावुक झाला. "त्यांचे निधन २४ नोव्हेंबर रोजी झाले. याच दिवशी माझ्या वडिलांचा (सलीम खान) वाढदिवस असतो. आणि उद्या (८ डिसेंबर) माझ्या आईचा (सलमा खान) वाढदिवस आहे," असे सलमान खान म्हणाला. यानंतर सलमान खानने थोडा ब्रेक घेतला, पण त्याचे अश्रू थांबले नाहीत. त्याने धर्मेंद्र यांचे पुत्र सनी देओल आणि बॉबी देओल यांना आठवले आणि दोघांनीही त्यांचे अंतिम संस्कार खूप चांगल्या पद्धतीने केले, असे सांगत त्यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त केली.
भाईजानला धर्मेंद्र मानायचे तिसरा मुलगा
धर्मेंद्र हे सलमान खानला आपला तिसरा मुलगा मानत होते. अनेकदा त्यांनी ही गोष्ट जाहीरपणे बोलून दाखवली होती की, 'सलमानमध्ये मला माझाच चेहरा दिसतो.' एकदा धर्मेंद्र सलमान खानच्या 'बिग बॉस' शोमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी सलमानला म्हटले होते, "तुझे प्रेम मला तरुण ठेवते. मी तर म्हणेन की हा (सलमान खान) माझा मुलगा आहे. मला तीन मुलगे आहेत. तिघेही भावूक, स्वाभिमानी आणि पारदर्शक आहेत. पण हा (सलमान) माझ्यावर गेला आहे, कारण तो रंगीन मिजाज आहे."
यापूर्वी सलमानच्या 'दस का दम' या शोमध्येही धर्मेंद्र यांनी सांगितले होते की, सलमानमध्ये त्यांना ७०-८० च्या दशकातील त्यांची झलक दिसते. तर सलमान खानही अनेकदा धरमजींनाच नेहमी फॉलो करत असल्याचे आणि त्यांच्या चेहऱ्यावरील निरागसता, चांगले रूप आणि सौंदर्याचे कौतुक करत असल्याचे बोलून दाखवले आहे.
देओल कुटुंबासोबत घट्ट नाते
धर्मेंद्र आणि सलमान यांच्यात खूप प्रेम होते आणि दोघेही अनेकदा भेटत असत. सलमानला धर्मेंद्रची मुलेही खूप मानतात. स्वतः बॉबी देओलने अनेकदा सांगितले होते की, जेव्हा त्याचा वाईट काळ सुरू होता, तेव्हा सलमानने त्याला मदत केली. सलमानने त्याला आपल्या 'रेस ३' चित्रपटामध्ये घेतले आणि त्याचे करिअर पुन्हा सुरू झाले. यामुळे सलमान खान आणि देओल कुटुंबातील भावनिक बंध अत्यंत घट्ट आहेत












Click it and Unblock the Notifications