केंद्रीय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी! 2026-27 सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; वाचा डिटेल्स
kendriya vidyalaya admission 2026 27 : आपल्या मुलाचे भविष्य उज्वल करण्यासाठी आणि प्रतिष्ठित केंद्रीय विद्यालयात (KVS) प्रवेश मिळवण्यासाठी वाट पाहणाऱ्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय विद्यालय संघटनने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेशाची नियमावली आणि अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदाही इयत्ता पहिली आणि बालवाटिका (१, २ व ३) मधील प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रियेवर भर देण्यात आला आहे, तर इयत्ता दुसरी आणि त्यापुढील वर्गांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

प्रवेशासाठी महत्त्वाच्या तारखा (KVS Registration Dates)
केव्हीएसने जारी केलेल्या कॅलेंडरनुसार अर्ज करण्याची मुदत समजून घेऊया.
- इयत्ता पहिली आणि त्याआधीचे वर्ग (१ ते ३): ऑनलाईन नोंदणी २० मार्च २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून सुरू होईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख २ एप्रिल २०२६ असेल.
- इयत्ता दुसरी आणि त्यापुढील वर्ग: रिक्त जागांच्या उपलब्धतेनुसार ऑफलाईन अर्ज प्रक्रिया २ एप्रिल ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान राबवली जाईल.
- नवीन सत्राची सुरुवात: इयत्ता दुसरी व त्यापुढील वर्गांचे शिक्षण १ एप्रिल २०२६ पासून, तर पहिली व बालवाटिकाचे वर्ग २० एप्रिल २०२६ पासून सुरू होतील.
केंद्रीय विद्यालय प्रवेशासाठी निश्चित करण्यात आलेली वयोमर्यादा (Age Limit)
(वयोमर्यादेची गणना करण्यासाठी ३१ मार्च २०२६ ही तारीख आधार मानली जाईल)
- नर्सरी-१: ३ ते ४ वर्षे
- ज्युनीयर केजी -२: ४ ते ५ वर्षे
- सीनियर केजी -३: ५ ते ६ वर्षे
- इयत्ता पहिली : ६ वर्षे पूर्ण
आवश्यक कागदपत्रे (Documents Required)
यंदा कागदपत्रांच्या तपासणीबाबत कडक सूचना देण्यात आल्या आहेत. पालकांनी खालील कागदपत्रे तयार ठेवावीत.
- पाल्याचा जन्म दाखला (Birth Certificate).
- निवास प्रमाणपत्र (Address Proof).
- सर्व्हिस सर्टिफिकेट (सरकारी कर्मचाऱ्यांसाठी).
- जातीचा दाखला (लागू असल्यास).
- अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास).
- EWS श्रेणीसाठी रेशन कार्ड किंवा बीपीएल कार्ड.
बदलीचे (Transfer) नियम काय?
सत्र सुरू असताना एका केंद्रीय विद्यालयातून दुसऱ्या विद्यालयात बदली केवळ पालकांच्या (सरकारी कर्मचारी) अधिकृत बदलीवरच शक्य होईल. सामान्य कारणास्तव शाळा बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही.
पालकांसाठी महत्त्वाची सूचना: ऑफलाईन अर्जासाठी ८ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी ४:०० वाजेपर्यंतची वेळ आहे, त्यामुळे वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे.












Click it and Unblock the Notifications