हार्दिक पांड्या आणि नताशाचा घटस्फोट का झाला ? 6 महिन्यांनी समोर आले खरं कारण
Hardik Pandya And Natasa Stankovic : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची माजी पत्नी नताशा स्टॅनकोविक यांचा गेल्या वर्षी घटस्फोट झाला. दोघांबद्दल बऱ्याच दिवसांपासून अफवा पसरत होत्या. अखेर त्यांनी घटस्फोटाची माहिती इन्स्टाग्रामद्वारे देण्यात आली.
हार्दिक आणि नताशा यांना एक गोड मुलगा आहे. हे दोघेही त्याच्यावर खूप प्रेम करतात. दोघांमधील घटस्फोटाची कारणे बराच काळ उघड झाली नव्हती, परंतु आता काही गोष्टी समोर येत आहेत. हार्दिक आणि नताशा यांच्या घटस्फोटामागील कारण उघड झाली आहेत.

नताशाने या घटस्फोटामागील कहाणी सांगितली आहे. नताशाकडून असं सांगण्यात आलं आहे की, हार्दिक हा एक असा व्यक्ती होता जो त्याच्या आयुष्यात तो आनंदी होता. त्याच्याकडे पत्नीसाठी वेळ नव्हता. त्याने पत्नीकडे कधी ही लक्ष दिले नाही. नताशाने हार्दिकसोबत समन्वय साधून राहण्याचा प्रयत्न केला पण ते घडले नाही.
नताशाकडून सांगण्यात येत आहे की, आपण खूप प्रयत्न केले, पण शेवटी मी थकली आणि हार मानली. यामुळे मला हार्दिकसोबत राहणे कठीण होऊ लागले. या सर्व कारणांमुळे नताशाने हार्दिक पांड्यापासून वेगळे होण्याचा मोठा निर्णय घेतला.
घटस्फोटानंतर हार्दिक पांड्या एकटाचं आपलं आयुष्य जगत आहे. जरी त्याचे नाव काही महिलांशी जोडले गेले असले तरी तसे काहीही घडले नाही. तो त्याच्या आगामी क्रिकेट सामन्याची तयारी करत आहे. घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पांढऱ्या चेंडूच्या मालिकेसाठी पंड्या सज्ज आहे.
दुसरीकडे, घटस्फोटानंतर नताशा आपल्या मुलाला सोबत घेऊन तिच्या देशात सर्बियाला गेली होती. त्यानंतर काही दिवसानंतर ती भारतात परतली. यानंतर हार्दिकला त्याच्या मुलासोबतही पाहिले पाहिलं गेलं. या बापलेकांमध्ये खूप प्रेम होते आणि त्यांचा आनंदही दिसत होता.












Click it and Unblock the Notifications