काय सांगता? तर 'हे' आहे विराट कोहली- अनुष्का शर्माचे लंडन शिप्ट होण्याचं कारण; सुरु झाल्या चर्चा
भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि बाँलिवूड अॅक्ट्रेस अनुष्का शर्मा हे जगातील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. गेल्या वर्षापासून हे जोडी लंडनमध्ये स्थायिक झाली. कामानिमित्त ते वारंवार भारतात येत असतात. विराट कोहलीही क्रिकेटमुळे भारतातच असतो, परंतु अनेकदा लंडनला घरीही जातो. या दोघांनी देश सोडून लंडनमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय का घेतला? याचं मोठ्ठ कारण आत्ता समोर आलं आहे. प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दिक्षीत हिचा पती डाँ. श्रीराम नेने यांनीच हे कारण जगासमोर आणलंय.

गेल्यावर्षी झाले स्थायिक
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे बी-टाउनमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत.अनुष्का शर्मा आणि विराट कोहली २०२४ पासून लंडनमध्ये स्थायिक झाले आहेत. अनुष्काने आपल्या दुसऱ्या मुलालाही लंडनमध्येच जन्म दिलाय. या जोडप्याने परदेशात स्थायिक होण्याची योजना अगदी गुप्तपणे आखली होती. गेल्या वर्षी ते तिथेच स्थायिकही झाले. भारतात ते अनेकदा दिसतात, परंतु आता त्यांनी लंडनमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय का घेतला, याची चर्चा सुरु झाली आहे.
अनुष्का- विराट देश का सोडला?
प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितचा पती डॉ. श्रीराम नेने यांनी अलिकडच्या एका मुलाखतीत अनुष्काने पती विराटसोबत लंडनला जाण्याचा निर्णय का घेतला याचा खुलासा केला. रणवीर इलाहाबादियाशी झालेल्या संभाषणात श्रीराम नेने म्हणाले, "आम्ही काल अनुष्काशी गप्पा मारल्या. त्या खूप मनमोकळ्या होत्या. ते लंडनला जाण्याचा विचार करत होते कारण त्यांना त्यांचे यश येथे आनंदाने अनुभवता येत नाही. आम्ही त्यांच्या वेदनांची कदर करतो कारण ते जे काही करतात ते लक्ष वेधून घेते. आम्ही एकटे पडतो."
काय म्हणाले श्रीराम नेने?
श्रीराम नेने यांनी हे देखील सांगितले की, अनेकदा आपले नाव झाल्याने आपल्या वैयक्तीक आयुष्यावर त्याचा परिणाम होतो. आपल्या आयुष्यात इतरांचे हस्तक्षेप वाढतात. हे हस्तक्षेप माधुरीलाही आवडत नाही. नेने पुढे म्हणाले की, "मी सर्वांशी मिसळतो. मी काळजीमुक्त असतो. पण ते आव्हानात्मक देखील असते. नेहमीच एक सेल्फी क्षण असतो. ही वाईट गोष्ट नाहीये. पण एक वेळ अशी येते जेव्हा तुम्ही रात्रीच्या जेवणाच्या वेळी किंवा दुपारच्या जेवणाच्या वेळीही इतरांना तुमच्याकडे बघताना बघत असता. त्यावेळी तुम्हाला शांत राहावे लागते. अनुष्का- विराट कोहली खूप छान लोक आहेत. त्यांना त्यांच्या मुलांना सामान्य पद्धतीने वाढवायचे आहे."












Click it and Unblock the Notifications