पाकिस्तान विरुद्ध खेळणार नाहीच! भारतीय खेळाडूंचा स्पष्ट नकार; WCL सेमीफायनलचा सामना रद्द
WCL 2025 IND vs pak : वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्स अर्थात डब्ल्युसीएल स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आता धुसर बनत आहे, कारण भारतीय खेळाडूंनी या सामन्यात खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता हा सेमीफायनलचा सामना रद्द होण्याची शक्यता जासत वाटत आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकविरोधात कडक धोरण राबवले. त्यातच सिंदूर ऑपरेशन या सर्व गोष्टींमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कटू झाले आहेत. त्याचाच हा परिणाम आहे. विशेष म्हणजे फक्त क्रिडाच नाही तर व्यापार, क्रिकेट आणि इतर खेळ आणि मनोरंजन क्षेत्राचे संबंधही बिघडले आहेत.

पाकिस्तान दहशदवाद्यांना देत असलेला आश्रय आणि मागे घडलेला पहलगाम हल्ला यामुळे भारतातून पाकिस्तानविरोधात प्रचंड रोष आहे. पाकिस्तानसोबत सर्व संबंध तोडावे अशी भारतीय जनतेची इच्छा आहे. संसदेतही यावर खल झाला आहे. सिंदूर ऑपरेशननंतर भारत- पाकिस्तान संबंध प्रचंड बिघडले तर दुसरीकडे विरोधकही पाकसोबतचे युद्ध का थांबवले म्हणून सरकारला जाब विचारत आहे, या पार्श्वभुमीवर पाकिस्तानसोबत खेळण्याची भारतीय खेळाडूंचीही इच्छा नाही.
सामना रद्द होण्याच्या वाटेवर
डब्ल्युसीएलच्या साखळी सामन्यात भारतीय खेळाडू शिखर धवन आणि इतरांनी पाकिस्तानसोबत खेळणार नाही असा पावित्रा घेतला होता. त्यानंतर हा सामनाच रद्द झाला. त्यानंतर आता सेमीफायनलचा सामना रद्द होण्याची शक्यता आहे त्याला महत्वाचे कारण म्हणजे भारतीय खेळाडू पाकविरोधात खेळण्यास नकार देत आहेत. मात्र, सामना होणार की नाही? आयोजकांकडून अधिकृतरित्या यासंदर्भात झालेली नाही.
आफ्रिदीने ओकली होती भारताविरोधात गरळ
भारताविरोधात पाकिस्तानी खेळाडूंनी सुमार वक्तव्य केली होती, त्यात शाहीद आफ्रिदीने तर भारतीय सैन्यांनाच आव्हान दिले आणि भारताविरोधात गरळ ओकली होती ही गोष्टही भारतीय खेळाडू विसरले नाही. याशिवाय काही पाकिस्तानी कलाकारांनीही बेसुमार वक्तव्यं केले होते.
..तर पाकिस्तान फायनलमध्ये पोहचणार!
सामना होईल की नाही हे जरी आता स्पष्ट नसले तरीही आयोजकांनी सामन्याबाबत कोणताही निर्णय दिलेला नाही. जर हा उपांत्य सामना रद्द झाला तर पाकिस्तानला अंतिम फेरीत प्रवेश मिळेल. गेल्या वर्षी हा सामना भारतीय संघाने जिंकला होता पण यावेळी याच्या नेमके उलटे होऊ शकते. लीग टप्प्यात पाकिस्तानने पॉइंट टेबलमध्ये पहिले स्थान मिळवले आहे. यापूर्वी, सामन्याचे प्रायोजक 'EaseMyTrip' देखील मागे हटले होते, ही कंपनी भारतातील आहे, यामुळे, त्यांनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचे प्रायोजकत्व करण्यास नकार दिला.
कधी होणार होता भारत पाक सामना?
भारत-पाक सेमीफायनल आज ३१ जुलै रोजी होणार आहे, लवकरच या सामन्याबाबत अधिकृत निर्णय जाहीर होईल. आयोजकांना अडचणी येत आहेत. गेल्या सामन्यात हरभजन सिंग, युसूफ पठाण, इरफान पठाण, शिखर धवन इत्यादी खेळाडूंनी खेळण्यास नकार दिला होता. कदाचित, यावेळीही खेळण्यास नकार देणाऱ्या खेळाडूंमध्ये पहिली नावे यामध्ये असतील. धवनने सोशल मीडियावर घोषणा करताना नकारही दिला होता.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications