VIDEO: रणजीमध्येही विराट कोहलीने चाहत्यांना केलं निराश, 6 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला
Virat Kohli Railways vs Delhi 2025: रणजी ट्रॉफीमध्ये 13 वर्षांनी परतलेला विराट कोहली पुन्हा एकदा फलंदाजीत अपयशी ठरला आहे. विराट कोहलीची फलंदाजी पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जमलेला प्रेक्षक कोहलीची विकेट पडल्यानंतर निराश झाले. विराट कोहली लवकर बाद होणे हा चाहत्यांसाठी मोठा धक्का होता.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये 13 वर्षांनी पुनरागमन करणारा विराट कोहली मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला आहे. या सामन्यात विराट कोहलीची खेळी जास्त काळ टिकली नाही. दरम्यान तो जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा त्याची उपस्थिती संघात एक विशेष ऊर्जा घेऊन येते. काही सामन्यांमध्ये त्याची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नसली तरी, त्याचा अनुभव नेहमीच संघासाठी उपयुक्त ठरला आहे.

विराट कोहली 6 धावा करुन बाद झाला
विराट कोहलीने रेल्वे संघाविरुद्ध एकूण 15 चेंडूंचा सामना केला. या काळात त्याला एका चौकाराच्या मदतीने फक्त 6 धावा करता आल्या आहेत. विराट कोहलीने 2012 मध्ये गाझियाबाद येथे उत्तर प्रदेशविरुद्ध शेवटचा घरगुती क्रिकेट सामना खेळला होता. रणजी ट्रॉफी सामन्यात त्याने रेल्वेविरुद्ध फक्त एक चौकार मारला. हिमांशूने विराटला बोल्ड करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
दिल्ली आणि रेल्वे यांच्यातील सामना अटीतटीचा होत आहे. रेल्वेने पहिल्या डावात 241 धावा करून चांगली कामगिरी केली आहे. विशेषतः उपेंद्र यादवचे 95 धावांचे योगदान आणि कर्ण शर्माचे अर्धशतक कौतुकास्पद होते. दिल्लीच्या गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली आहे. या सामन्यात नवदीप सैनी आणि सुमित माथूर ने प्रत्येकी तीन बळी घेतले आहेत.
Crowd leaving the Arun Jaitley Stadium. pic.twitter.com/Jv5Fxu0h5X
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 31, 2025
आता दिल्लीला रेल्वेने दिलेले टार्गेट गाठण्यासाठी आणखी 150 धावा करायच्या आहेत. पण त्यासाठी त्यांना संयमाने फलंदाजी करावी लागेल. संघाला आता कर्णधार आयुष बदोनीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. विराट कोहली बाद होताच चाहते स्टेडियममधून परतताना दिसले.












Click it and Unblock the Notifications