Champions Trophy 2025 साठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही! जाणून घ्या कुठे होणार भारताचे सामने
Champions Trophy 2025 : T20 विश्वचषक 2024 नंतर आता ICC ची पुढची स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी असणार आहे. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला जाण्याची शक्यता नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआय आयसीसीला दुबई किंवा श्रीलंकेत सामना आयोजित करण्यास सांगेल. पुढील वर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे.
टीम इंडियाचे सामने श्रीलंकेत होऊ शकतात
चॅम्पियन्स ट्रॉफी फेब्रुवारी-मार्चमध्ये हायब्रीड मॉडेलमध्ये होण्याची शक्यता आहे, कारण भारत एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानला जाण्याची शक्यता फारच कमी आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे, जे 2017 नंतर प्रथमच क्रिकेट कॅलेंडरमध्ये परतणार आहे. मात्र या स्पर्धेतील काही सामने श्रीलंकेत होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे
दरम्यान ICC चॅम्पियन ट्रॉफी पुढील वर्षी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च 2025 दरम्यान पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे, जी 50 षटकांची स्पर्धा असणार आहे. मात्र, या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार का, हा आतापर्यंतचा महत्त्वाचा प्रश्न होता, त्यावर काही प्रमाणात परिस्थिती स्पष्ट होताना दिसत आहे.
Indian Cricket team is unlikely to travel to Pakistan for the 2025 ICC Champions Trophy. BCCI will ask ICC to host matches in Dubai or Sri Lanka: BCCI sources to ANI pic.twitter.com/o7INJKhk1E
— ANI (@ANI) July 11, 2024
सर्व सामने लाहोरमध्ये खेळवले जातील
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारताचे सर्व सामने लाहोरमध्ये आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. रिपोर्टनुसार, भारतीय संघ पाकिस्तानला जाण्याची शक्यता कमी असून अंतिम निर्णय भारत सरकारवर अवलंबून आहे.
भारत सरकार अंतिम निर्णय घेईल
टीम इंडियाच्या पाकिस्तानात जाण्याची शक्यता फारच कमी आहे, या संदर्भात एका सूत्राने सांगितले की, 'भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नसल्याची शक्यता आहे. शेवटी, निर्णय भारत सरकारवर अवलंबून आहे. दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) या महिन्यात श्रीलंकेत होणाऱ्या आयसीसीच्या आगामी बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्याचा विचार करत आहे.












Click it and Unblock the Notifications