विराट, रोहीतनंतर 'या' भारतीय खेळाडूने घेतली निवृत्ती
नवी दिल्ली: टी-20 विश्वचषक 2024 जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहीत शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहलीने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर आता भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

त्याने इंस्टाग्राम पोस्टवर 4 ओळींचा संदेश लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या. तत्पूर्वी, T20 विश्वचषक जिंकल्यानंतर लगेचच, माजी कर्णधार विराट कोहलीने सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतर काही वेळातच पत्रकार परिषदेत आनंदाच्या भरात विश्वविजेत्या संघाचा कर्णधार रोहित शर्माने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.
आता ही घोषणा करताना रवींद्र जडेजाने इंस्टाग्रामवर एक भावनिक संदेश लिहिला आहे. तो म्हणाला- मी मनापासून T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांना निरोप घेत आहे."सुसाट वेगानं अभिमानानं धावणाऱ्या अश्वमेधाप्रमाणं मी नेहमीच माझ्या देशासाठी माझे सर्वोत्तम दिले आहे. यासोबतच जडेजाने इतर फॉरमॅटवरही मोठं वक्तव्य केलं आहे. तो म्हणाला- मी वनडे आणि कसोटी खेळत राहीन".
जगातील सर्वात उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी एक असलेल्या रवींद्र जडेजाने विश्वचषक विजेते होण्याच्या भावनेबद्दल सांगितले - T20 विश्वचषक जिंकणे हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे होते, हा माझ्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा सर्वोच्च शिखर आहे. आठवणी, उत्साह आणि अतूट पाठिंब्याबद्दल धन्यवाद. रवींद्र जडेजा टी-20 विश्वचषक विजेता झाल्यानंतर भावूक झाला होता. त्याच्या डोळ्यातही अश्रू आले होते.


Click it and Unblock the Notifications