IND vs ENG: अक्षर-कुलदीपपुढे इंग्लंडने टेकले गुडघे, भारताचा फायनलमध्ये दणक्यात प्रवेश
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करत फायनलमध्ये प्रवेश केला. गुरुवारी (27 जून) झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाचा 68 धावांनी पराभव केला. 29 जून शनिवारी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा अंतिम सामना रंगणार आहे.
दोन वर्षांपूर्वी सेमीफायनलमध्ये झालेल्या इंग्लंडने केलेल्या पराभवाचा बदला भारताने या दणदणीत विजयाच्या रुपाने घेतला आहे. गेल्या टी-20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीत इंग्लंडने भारतीय संघाचा 10 गडी राखून पराभव करत स्पर्धेबाहेर काढले होते. आता रोहित ब्रिगेडने त्या पराभवाचा बदला घेत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक गमावली. प्रथम फलंदाजी करताना भारताने इंग्लंडसमोर 172 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ अवघ्या 16.4 षटकांत 103 धावांवर गारद झाला.
भारतीय फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडला एकही संधी दिली नाही.
हॅरी ब्रूकने 25, कर्णधार जोस बटलरने 23, जोफ्रा आर्चरने 21 आणि लियाम लिव्हिंगस्टोनने 11 धावा केल्या. याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. दुसरीकडे फिरकीपटू कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. तर जसप्रीत बुमराहला 2 खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला.
रोहितचे धमाकेदार अर्धशतक, सूर्या-पांड्याची दमदार खेळी
या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 7 गडी गमावून 171 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने 36 चेंडूत अर्धशतक केले. त्याने 39 चेंडूत 57 धावांची शानदार खेळी केली. त्याने 2 षटकार आणि 6 चौकार मारले. तर सूर्यकुमार यादवने 36 चेंडूत 47 धावा केल्या.
𝙄𝙣𝙩𝙤 𝙏𝙝𝙚 𝙁𝙞𝙣𝙖𝙡𝙨! 🙌 🙌#TeamIndia absolutely dominant in the Semi-Final to beat England! 👏 👏
— BCCI (@BCCI) June 27, 2024
It's India vs South Africa in the summit clash!
All The Best Team India! 👍 👍#T20WorldCup | #INDvENG pic.twitter.com/yNhB1TgTHq
याशिवाय हार्दिक पांड्याने 13 चेंडूत 23 धावांची निर्णायक खेळी केली. शेवटी रवींद्र जडेजाने 9 चेंडूत नाबाद 17 धावा केल्या. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर रीस टोपले, जोफ्रा आर्चर, सॅम कुरन आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यात रोमांचक लढत
जेव्हा-जेव्हा भारत आणि इंग्लंडचे संघ T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आमनेसामने आले आहेत, तेव्हा दोघांमध्ये रोमांचक लढत झाली आहे. या दोन संघांमध्ये आतापर्यंत एकूण 24 टी-20 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारताने 13 तर
इंग्लंडने 11 सामने जिंकले आहेत.
T20 विश्वचषकाच्या इतिहासातील दोन संघांमधील संघर्षाची आकडेवारी पाहिली तर त्यातही भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ बरोबरीचे दिसतात. T20 विश्वचषकात आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 5 सामने झाले आहेत, ज्यामध्ये भारताने 3 सामने जिंकले आहेत आणि 2 गमावले आहेत.












Click it and Unblock the Notifications