Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

"सडके अंडे सर्वच खराब करतात! खेळायचं नव्हतं तर घरीच थांबायचं" शाहीद आफ्रीदीची टीम इंडियावर कठोर टीका

Shahid Afridi's harsh criticism of Shikhar Dhawan and Team India : भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड चॅम्पियनशिप लीगचा अंतिम सामना रविवारी होणार होता, मात्र भारताचे पाकिस्तानसोबत असलेले तणावाचे संबंध पाहता भारताने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार दिला आहे, त्यामुळे वर्ल्ड चॅम्पियनशिप चा फायनल सामना होऊ शकला नाही. आता या सामन्यावरून पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी याचा चांगलाच तीळपापड झाला आहे.

भारतातील पहलगाम हल्ला आणि त्यानंतर पाकिस्तानी अतिरेक्यांच्या तळावर भारताने सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून केलेली कारवाई याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानकडून हल्ले झाले होते. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांचे संबंध बिघडले तसेच दोन्ही देशांच्या स्पर्धेतही खेळण्याची आता भारतीय क्रीडापटुंची इच्छा राहीली नाही.

Shahid Afridi s harsh criticism

पाकिस्तानशी खेळणी नको असं भारतीय जनतेचे मत बनले अशा स्थितीमध्ये अंतीम सामन्याच्या दोन दिवसांपुर्वीच भारतीय खेळाडूंनी पाकिस्तान सोबत क्रिकेट मॅच खेळण्यास नकार दिला आहे त्यामुळे उभय देशातील क्रिकेटचे संबंध हे आणखी तणावाचे बनले आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेटर शहीद आपली देणे तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला शाहीद आफ्रिदी?

माध्यमांशी बोलताना शाहिद आफ्रिदी मनाला प्रत्येक गोष्टींमध्ये राजकारण आणले तर तुम्ही पुढे कसे जाल, खेळ दोन देशांना जवळ आणतो आणि त्याचा हा उद्देश असतो. विना चर्चा आणि संवादाशिवाय प्रश्न सुटू शकत नाहीत.

सडके अंडे...!

शाहीद फ्रिदीने हेही म्हटले की, तुम्हाला माहिती आहेच की एक कुजलेले अंडे सगळं बिघडवते हे सांगत शाहिद आफ्रिदीने निराशा व्यक्त केली आणि शिखर धवनवर निशाणा साधला, तो म्हणाला की, भारतीय खेळाडू निराश झाले आहेत, ते येथे खेळण्यासाठी आले आहेत. तुम्ही तुमच्या देशाचे चांगले ब्रँड अँम्बेसेडर व्हायला हवे. तुम्ही लाजिरवाणे होऊ नये. त्यांच्या मते, जर भारत खेळू इच्छित नसता तर ते घरीच राहिले पाहिजे होते.

मी खेळणार नाही..शिखर धवन होता ठाम

शिखर धवनने सामन्याच्या आदल्या दिवशी सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या निर्णयाची माहिती दिली होती आणि म्हटले होते की ११ मे रोजी मी हा सामना खेळणार नाही, मी घेतलेल्या पावलावर मी अजूनही ठाम आहे. माझा देश माझ्यासाठी सर्वस्व आहे. देशापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही. धवनने ई-मेल पाठवून आयोजकांना आपल्या निर्णयाची माहिती दिली होती.

शिखर धवन- आफ्रीदी वाद

शिखर धवन आणि शाहिद आफ्रिदीचे भांडण ऑपरेशन सिंदूर दरम्यान शाहिद आफ्रिदीने खूप विष ओकले होते. धवनने सोशल मीडियावरही त्याच्यावर टीका केली. तेव्हापासून, धवनने पाकिस्तानी खेळाडूंना त्यांची जागा दाखवून दिली आहे. तो अजूनही त्यावर ठाम आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+