Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारताने दुसऱ्यांदा महिला T20 अंडर 19 वर्ल्डकप जिंकला, यापूर्वी कधी झाला होता विजय, जाणून घ्या इतिहास

SA Women U19 vs IND Women U19, Final Match : भारताने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने पराभव करून ICC महिला 19 वर्षांखालील T-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात विजय मिळवला आहे. आपले विजेतेपद यशस्वीरित्या राखून, टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरलं.

सलामीवीर गोंगडी त्रिशाच्या 44 धावांच्या जोरावर भारताने क्वालालंपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा नऊ विकेट्सने पराभव केला. फक्त 83 धावांचे लक्ष्य असल्याने भारताला खूप मोठे आव्हान नव्हते.

टीम इंडियाने फक्त 11.2 षटकांत फक्त एक विकेट गमावून विजय मिळवला. त्याआधी, संपूर्ण गोलंदाजांच्या योगदानामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला 20 षटकांत 82 धावांत गुंडाळले.

SA Women U19 vs IND Women U19  Final Match

भारताने सलग दुसऱ्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला

भारताचा १९ वर्षांखालील महिला संघ या स्पर्धेचा गतविजेता आहे. 2023 मध्ये त्यांनी अंतिम सामन्यात इंग्लंडला हरवून विजेतेपद जिंकले आणि आता सलग दुसऱ्यांदा भारतीय संघाने विश्वचषक विजेतेपद जिंकले आहे.

2023 मध्ये झालेल्या पहिल्याच सामन्यात कसा रचला होता इतिहास

2023 साली दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या पहिल्या वहिल्या अंडर-19 वूमन्स टी-20 वर्ल्डकप स्पर्धेवर भारताने आपलं नाव कोरलं होते. भारतीय संघाने प्रतिस्पर्धी इंग्लंड संघाला केवळ 68 धावांवर रोखून निर्धारित लक्ष्य 3 विकेट्सच्या मोबदल्यात केवळ 14 षटकांत गाठलं होतं. पहिल्याच अंडर-19 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने नाव कोरलं होतं. तेव्हा भारतीय संघाचे सर्वत्र कौतुकही झाले.

पहिल्या वर्ल्डकप फायनलमध्ये कोणी केली कामगिरी?

जानेवारी 2023 मध्ये झालेल्या पहिल्या वहिल्या अंडर-19 टी-20 सामन्यात सौम्या तिवारी (नाबाद 24) आणि गोंगदी त्रिशा (24 धावा) काढल्या होत्या. त्याचबरोबर भारताकडून कर्णधार शफाली वर्माने 15 तर श्वेता सहरावतने पाच धावा केल्या होत्या. भारताच्या पहिल्या दोन विकेट गेल्या तेव्हा स्कोअर 20 धावा होता. पण त्यानंतर त्रिशा आणि सौम्या यांनी 46 धावांची भागिदारी केली होती.

भारताची कर्णधार शफाली वर्मा हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तिचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवून इंग्लंडला सुरुवातीपासूनच जोरदार धक्के दिले होते. पहिल्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर वेगवान गोलंदाज तितास संधूने इंग्लंडची सलामीवर लिबर्टी हिप हिला माघारी धाडलं. त्यानंतर ठराविक अंतराने इंग्लंडचे फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर झालेल्या विजयाने भारतीय महिला संघाचा सर्वत्र गाजावाजा झाला होता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+