५० किंवा १०० नाही तर दबाव निर्माण करणं महत्त्वाचं होत; स्फोटक खेळीनंतर रोहितने सगळचं सांगितलं
Mumbai: रोहितने ४१ चेंडूत सात चौकार आणि आठ षटकारांसह ९२ धावांची शानदार खेळी खेळली. यामुळंं भारत २०५ धावांचा पल्ला गाठू शकला. वर्ल्डकपच्या या सीझनमध्ये कुठल्याही संघ या धावसंख्येपर्यंत अद्याप पोहोचू शकलेला नाही.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने सोमवारी आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या सुपर ८ च्या गट एकच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केल्यावर सांगितले की, त्याच्या झंझावाती अर्धशतकादरम्यान, त्याला फक्त फलंदाजी करायची होती. त्याच स्टाईलने तो आजपर्यंत फलंदाजी करत आला आहे.

रोहितने ४१ चेंडूत सात चौकार आणि आठ षटकारांसह ९२ धावांची शानदार खेळी खेळली. त्याने ऋषभ पंत (१५) सोबत दुसऱ्या विकेटसाठी अवघ्या ३८ चेंडूत ८७ धावांची भागीदारी केली. सामनावीर म्हणून निवड झालेल्या रोहितने सांगितले की, तो आजवर करत असलेल्या शैलीतच फलंदाजी करू इच्छितो.
सामन्यानंतर रोहित म्हणाला, 'जेव्हा तुम्ही खुल्या मनाने खेळता आणि फक्त एका शॉटचा विचार करत नाही, तेव्हा तुम्ही मैदानाच्या सर्व भागात धावा करू शकता. ही विकेट चांगली होती. गेल्या काही वर्षांपासून मी यासाठी प्रयत्न करत आहे आणि आज ते शक्य झाल्याचा मला आनंद आहे.
तो म्हणाला, 'अर्धशतके आणि शतकांनी काही फरक पडत नाही. मला मोठी धावसंख्या उभी करायची होती. आज ते काम मी करू शकलो याचा मला आनंद आहे.
जोरदार वाऱ्याबद्दल रोहित म्हणाला...
जोरदार वाऱ्यामध्ये फलंदाजीबाबत रोहित म्हणाला, 'मला पहिल्या षटकापासूनच वाटले की जोरदार वारा आहे. त्यामुळं मी प्लॅन बदलला. शॉर्ट्स खेळताना तुम्हाला वाऱ्याचीही काळजी घ्यावी लागते. गोलंदाजही हुशार आहेत. मैदानाच्या चारही बाजूंनी शॉट्स खेळावे लागतील हे समजून घ्यावे लागेल, असेही रोहितने सांगितले.
सलामीवीर ट्रॅव्हिस हेडचे अर्धशतक (७६ धावा, ४३ चेंडू, नऊ चौकार, चार षटकार) आणि कर्णधार मिचेल मार्श (३७) दुसऱ्या विकेटसाठी ८१ धावा आणि ग्लेन मॅक्सवेल (२०) तिसऱ्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी करूनही ते सात बाद १८१ धावाच करू शकले.
भारताच्या २०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ १८१ धावाच करू शकला. भारताकडून अर्शदीपने ३७ धावांत तीन बळी घेतले, तर कुलदीप यादवने २४ धावांत दोन बळी घेतले. अक्षर पटेल (२१ धावांत एक विकेट) आणि जसप्रीत बुमराह (२९ धावांत एक विकेट) यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.
समाधानकारक विजय, धोका आम्हाला माहीत होता
रोहित म्हणाला, हा विजय समाधानकारक आहे. समोरचा संघ काय धोका आणतो हे आम्हाला माहीत आहे. एक संघ म्हणून आम्ही चांगली कामगिरी केली, आम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टी केल्या. एक संघ म्हणून आम्हाला चांगला आत्मविश्वास मिळतो.

200 ही चांगली धावसंख्या आहे, परंतु जेव्हा तुम्ही येथे खेळत असाल आणि वारा हा एक मोठा घटक असेल तेव्हा काहीही होऊ शकते. तथापि, मला वाटते की आम्ही परिस्थितीचा खरोखर चांगला उपयोग केला.
कुलदीपचे कौतुक करताना रोहित म्हणाला, कुलदीप काय करू शकतो हे आम्हाला माहीत आहे. गरज पडेल तेव्हा त्याला आम्ही वापरतो. न्यूयॉर्कमधील विकेट वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल होत्या. तो एका ठिकाणी चुकला, परंतु आम्हाला माहित होते की त्याची येथे मोठी भूमिका आहे.
सेमी फायनलसाठी वेगळा प्लॅन नाही
रोहित म्हणाला, उपांत्य फेरीत आम्हाला वेगळे काही करायचे नाही. या स्पर्धेत आम्ही ज्या पद्धतीने खेळत होतो, त्याच पद्धतीने खेळायचे आहे. प्रत्येक खेळाडूला त्याची भूमिका काय आहे हे माहित आहे. मुक्तपणे खेळा आणि पुढे काय होईल याचा जास्त विचार करू नका.
समोरच्या संघाचा जास्त विचार करू नका.आम्ही ज्या पद्धतीन कामगिरी करत आहोत त्यात सातत्य राखणं फक्त आवश्यक आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध चांगला सामना होणार असल्याचे रोहिने सांगितले.












Click it and Unblock the Notifications