मोठी बातमी: रोहित-विराटच्या पुनरागमनाला पुन्हा 'ब्रेक'; BCCIचा मोठा निर्णय अन् चाहत्यांमध्ये नाराजी!
rohit sharma and virat kohli latest News : रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांच्या चाहत्यांना त्यांच्या खास प्लेअरला पुन्हा खेळताना पाहण्यासाठी आणखी बरेच दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण, बीसीसीआयने घेतलेल्या एका निर्णयामुळे आता रोहित-विराटच्या पुनरागमनाला पुन्हा ब्रेक बसलाय.
नेमकं काय घडलं, जाणून घ्या सविस्तर!
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळणार होती. मात्र, अनेक कारणांमुळे ही मालिका थेट २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे, भारतीय क्रिकेट चाहत्यांना, विशेषतः रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे, कारण या दोघांचेही पुनरागमन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे आता चाहतेही नाराज झाले आहेत.

बांगलादेश मालिका का पुढे ढकलली?
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर टीम इंडिया थेट आशिया कप खेळणार होती, पण आशिया कपबद्दलही सध्या अनिश्चितता आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्यातच बांगलादेशविरुद्धची मालिका खेळली जाण्याची शक्यता होती, ज्यामुळे रोहित आणि विराटच्या पुनरागमनाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. आता या मालिकेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
BCCI ची भूमिका अन् श्रीलंकेची धुडकावली ऑफर!
बांगलादेशविरुद्धची मालिका पुढे ढकलल्यानंतर, दोन देशांच्या क्रिकेट मंडळांनी BCCI ला ऑगस्टमध्येच मालिका आयोजित करण्याची ऑफर दिली होती. यापैकी एक संघ श्रीलंकेचा होता.
BCCI सध्या श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळण्यास उत्सुक नाही. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका ऑफर केली होती. परंतु, वृत्तानुसार, BCCI च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही मालिकेबद्दल निर्णय घेऊ, पण ते अशक्य वाटते." याचा अर्थ, BCCI सध्या ऑगस्ट महिन्यात कोणतीही आंतरराष्ट्रीय मालिका खेळू इच्छित नाही.
रोहित-विराटचे पुनरागमन पुन्हा लांबणीवर
भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ नंतर आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले नाहीत. टी-२० फॉरमॅटनंतर, या दोघांनीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अशा परिस्थितीत, ते फक्त एकदिवसीय सामन्यांमध्येच खेळताना दिसतील.
BCCI ने ऑगस्टमध्ये कोणतीही मालिका खेळण्यास नकार दिल्याने, या दोन्ही दिग्गजांना आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. टीम इंडिया आता ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुढील एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यामुळे, रोहित आणि विराटच्या चाहत्यांना आता थेट ऑक्टोबर महिन्याची वाट पहावी लागेल. मात्र, त्यानंतर टीम इंडिया सतत एकदिवसीय मालिका खेळताना दिसेल, ज्यामुळे या खेळाडूंना पुन्हा मैदानात पाहण्याची संधी मिळेल.












Click it and Unblock the Notifications