रिंकू सिंग रातोरात करोडपती, न खेळताही त्याच्याकडे एवढा पैसा आला कसा?
मुंबई: आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडरकडून रिंकू सिंगने धडाकेबाज खेळी केली.आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी रिंकू सिंग ओळखला जातो. तो एक उत्कृष्ठ खेळाडू म्हणून पुढे येत आहे. आयपीएलमध्ये खेळण्यासाठी त्याला ५५ लाख रुपये मिळतात.
त्याला ही रक्कम केकेआरकडून मिळते. खेळीच्या तुलनेत रिंकूला मिळणारे मानधन फारसे जास्त नाही तरीही हा खेळाडू रातोरात करोडपती झाला कसा? हा प्रश्न तुम्हा आम्हाला पडला असेल तर या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.

..अन् रिंकूचे नशीब फळफळले
रिंकूला त्याच्या खेळानुसार आयपीएलमध्ये मिळालेली रकम करोडपती होण्यासाठी फारशी नाही. तसे पाहता आयपीएलमध्ये खेळणारा रिंकू या स्पर्धेत कितीतरी पटीने अधिक पैसे मिळवण्यास पात्र असल्याचे बोलले जात आहे. त्याचा खेळही स्फोटक आहे. तो करोडोंची कमाई करणारा खेळाडू आहे.
अनेक खेळाडूंनी खेळाच्या जोरावर करोडोंची कमाई केली पण रिंकू सिंग आयपीएलमध्ये करोडपती झाला नाही तर त्याला विश्वकप विजयामुळे करोडपती बनवले आणि त्याचे नशीब फळफळले तसे पाहता तो एका रात्रीत करोडपती झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
रिंकू राखीव खेळाडू असूनही करोडपती
सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे त्याला आयपीएल किंवा कुठेही खेळण्याची गरज नाही. न खेळताही एका क्षणात त्याने करोडो रुपये मिळवले. रिंकू सिंगला टी- 20 विश्वचषक जिंकण्यासाठी पैसे मिळाले आहेत.
टीम इंडियाच्या संघातही त्याचा समावेश नव्हता. केवळ राखीव खेळाडू असूनही त्याला ही मोठी रक्कम मिळाली. बीसीसीआयकडून मिळालेल्या 125 कोटी रुपयांमध्ये रिंकू सिंगचाही वाटा आहे आणि यामुळेच तो करोडपती ठरला.
या खेळाडूंची झाली चांदी..!
बोर्डाकडून मिळालेल्या रकमेच्या वितरणात राखीव खेळाडूंना प्रत्येकी एक कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. रिंकूशिवाय शुभमन गिल, आवेश खान आणि खलील अहमद यांचा राखीव खेळाडू म्हणून टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला होता. या सर्व खेळाडूंची चांदी झाली आहे. हे 3 भारतीय खेळाडूंना एकही सामना न खेळता 5 कोटी रुपये मिळतील.
15 खेळाडूंना प्रत्येकी 5 कोटी रुपये
टीम इंडियामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व 15 खेळाडूंना प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हीच रक्कम भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना देण्यात येणार आहे. तर उर्वरित रक्कम स्पोर्ट स्टाफ आणि इतरांमध्ये वाटली जाईल. त्यात निवडकर्त्यांचाही समावेश आहे. टी ट्वेंटी विश्वचषक जिंकल्यामुळे भारतीय संघावर बक्षीसाचा वर्षाव झालेला आहे.












Click it and Unblock the Notifications