Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL Final : आरसीबी IPL फायनलमध्ये 'चोकर' चा टॅग फुसेल का?, मागील 3 फायनलचे रेकॉर्ड काय सांगतात?

What is RCB's history in IPL finals : आयपीएल इतिहासातील सर्वात प्रसिद्ध संघांपैकी एक रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) पुन्हा एकदा जेतेपदाच्या उंबरठ्यावर जाऊन बसला आहे. पंजाबला हरवून बंगळुरू टीमने फायनलमध्ये थेट प्रवेश मिळवला. फायनलमध्ये प्रवेश मिळवणारा आरसीबी संघ पहिल्यांदाच आला असे नाही, यापूर्वी देखील तीन वेळा हा संघ फायनलमध्ये आला परंतू त्या ठिकाणी त्याला यश मिळाले नाही.

2009, 2011 आणि 2016 मध्ये अंतिम फेरी गाठूनही, या संघाने जेतेपद गमावले. आयपीएलच्या सुरुवातीपासून एक पिढी बदलली आहे, परंतु आरसीबी संघाला आजपर्यंत आयपीएलचे जेतेपद जिंकता आलेले नाही. यावेळी आरसीबीच्या पदरात यश मिळेल का हे येत्या काही दिवसांतच समजणार आहे.

यावेळी आरसीबी संघ आयपीएलमध्ये ज्या पद्धतीने खेळला आहे. त्यामुळे त्याने अनेक विक्रमही केले आहेत. 18 वर्षांच्या इतिहासात आरसीबी पहिला संघ बनला आहे, ज्याने त्याचे सर्व होम-अवे (इतर ठिकाणचे) सामने जिंकले आहेत. म्हणजेच, 'ई साला कप नामदे', म्हणजेच 'या वर्षी कप आपला आहे' हे खरे सिद्ध होऊ शकते. कारण, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांना आता हा कप आपलाच असल्याची भावना निर्माण झाली आहे.

पण, इतिहासाच्या पानांमध्ये आरसीबी संघाशी संबंधित अनेक गोष्टी अशा आहेत. की आरसीबी फायनलमध्ये जाते पण तेथून ते पराभूत होते, ही त्यांची आठवण यावेळी संघाला देखील आहे. दुसरी बाब म्हणजे, यावेळी कर्णधार पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबी अंतिम फेरीत 'चोकर'चा टॅग पुसून टाकू शकेल का? की ही अंतिम मॅचच्या दिवशी दिसून येईल. हा संघ चोकरचा टॅग पुसून काढेल का, चला तर संघाचे मागील फायनलमधील रेकॉर्ड काय आहेत, याविषयी जाणून घेऊया.

IPL Final

2009 मध्ये आरसीबीचा 6 धावांनी पराभव

इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर, 2008 मध्ये त्याची सुरुवात झाली. त्यानंतर पहिल्यांदाच राजस्थान रॉयल्स संघाने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून विजेतेपद पटकावले.

दुसरीकडे, आरसीबी संघाला 2009 मध्ये पहिला आयपीएल फायनल खेळण्याची संधी मिळाली. 24 मे 2009 रोजी जोहान्सबर्ग येथे आरसीबी आणि डेक्कन चार्जर्स (DC) यांच्यातील सामना झाला. जिथे गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली प्रथम खेळणाऱ्या डीसीने 20 षटकांत 143/6 धावा केल्या.

प्रत्युत्तरात, आरसीबी 9 विकेटच्या मोबदल्यात फक्त 137 धावा करू शकला आणि विजेतेपदाचा सामना 6 धावांनी गमावला. त्या सामन्यात कोहलीने 7 धावा केल्या होत्या, आरसीबीचा कर्णधार अनिल कुंबळेने त्या सामन्यात 16 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट घेतल्या.

Take a Poll

2011 मध्ये CSKकडून RCBचा पराभव

2011 मध्ये आरसीबीला दुसरा आयपीएल फायनल खेळण्याची संधी मिळाली. हा सामना 28 मे रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झाला. यापूर्वी खेळणाऱ्या चेन्नईने 'प्लेअर ऑफ द मॅच' मुरली विजयच्या 95 धावांमुळे 205/5 धावा केल्या.

प्रत्युत्तरादाखल, डॅनियल व्हेटोरीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आरसीबीला फक्त 147/8 धावा करता आल्या. त्या सामन्यात विराट कोहलीने 35 धावा केल्या. आरसीबीचा सौरभ तिवारी 42 धावांसह संघाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.

2016 मध्ये आरसीबी जिंकता जिंकता हारली

आयपीएल 2026 चा हा हंगाम विराट कोहलीसाठी खूप चांगला होता, कारण या हंगामात त्याने 16 सामन्यांमध्ये 81.08 च्या सरासरीने आणि 152.0 च्या स्ट्राईक रेटने 973 धावा केल्या.

हा हंगामातील कोणत्याही खेळाडूचा सर्वोत्तम धावसंख्या आहे. आयपीएल 2016 च्या अंतिम सामन्यात विराट कोहली आरसीबीचे नेतृत्व करत होता आणि त्याचा सामना सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) चा कर्णधार डेव्हिड वॉर्नरशी होता.

हा सामना 29 मे 2016 रोजी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला. डेव्हिड वॉर्नरच्या 69 धावांच्या जोरावर एसआरएचने 7 विकेट गमावून 208 धावा केल्या.

त्यानंतर या सामन्याच्या धावांचा पाठलाग करताना बंगळुरू संघाने 10.3 षटकांत 114 धावा जोडल्या, येथून आरसीबीचा विजय निश्चित दिसत होता. त्यानंतर सलामीवीर ख्रिस गेल (76) या धावसंख्येवर बाद झाला.

त्यानंतर कोहली (54) देखील आरसीबीच्या 140 धावांवर बाद झाला. पण या दोन्ही खेळाडूंना बाद केल्यानंतर संपूर्ण आरसीबी संघ पत्त्यांच्या गठ्ठ्यासारखा कोसळला आणि सामन्यात 8 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

...चोकरचा टॅग काढून टाकेल का?

एकंदरीत, यातून स्पष्ट होते की, आरसीबी अनेक वेळा आयपीएल संघ चॅम्पियन बनण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे, परंतु अंतिम सीमा त्यांनी ओलांडलेली नाही. अशा परिस्थितीत, प्रश्न असा असेल की हा संघ चोकरचा टॅग काढून टाकू शकेल का.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+