Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रवींद्र जडेजाची पोस्ट, अखेर निवृत्तीबद्दलच्या चर्चांवर सोडलं मौन

Champions Trophy, Ravindra Jadeja: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंड संघाचा 4 विकेट पराभव करुन विजेतेपद जिंकलं आहे. मात्र या स्पर्धेत अफवा टीम इंडियाच्या खेळाडूंबद्दल अनेक अफवा ऐकायला मिळाल्या. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू सर रविंद्र जडेजा आपल्या 10 ओव्हरचा स्पेल पूर्ण केल्यानंतर त्यांने विराट कोहलीला मिठ्ठी मारली. त्यानंतर सोशल मिडीयावर सर रविंद्र जडेजाचा हा शेवटचा सामना असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र आता या चर्चेना पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान सामना संपल्यानंतर रवींद्र जडेजा याने अद्याप एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत नसल्याचे स्पष्ट केले आहे. रविवार 9 मार्च रोजी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने शानदार विजय विजय मिळवला आहे. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात जडेजाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जडेजाने फलंदाजी आणि चेंडू दोन्हीतून उत्कृष्ट योगदान दिलं आहे. भारताने एक षटक शिल्लक असताना 252 धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या पूर्ण करुन इतिहासात तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्यात यश मिळवलं आहे.

Ravindra Jadeja

रवींद्र जडेजाने निवृत्तीबद्दल पोस्ट

अंतिम सामन्यानंतर अनेकांनी असा अंदाज लावला होता की रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा सारखे खेळाडू या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतात. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, "मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होत नाहीये. कृपया खोट्या अफवा पसरवू नका." तर जडेजाने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून स्पष्ट केले की आपण निवृत्त होत नाही. जडेजाने इन्स्टाग्रामवर निवृत्तीच्या अफवांना पूर्णपणे फेटाळून लावत म्हटलं आहे की, "अनावश्यक अफवा नकोत. धन्यवाद."

जडेजाने विजयी धाव घेतली

जेव्हा जडेजाला विजयी धावा काढण्याची संधी मिळाली तेव्हा अनेकांना वाटले की, जडेजासाठी त्याच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात संघाला विजय मिळवून देण्याची ही एक उत्तम संधी आहे. दरम्यान सामन्यानंतरही जडेजा किंवा इतर कोणत्याही भारतीय संघातील खेळाडूने हा अष्टपैलू खेळाडूचा शेवटचा सामना असल्याचे संकेत दिले नाहीत. त्याऐवजी सर्व खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीमधील विजय साजरा करण्यात व्यस्त होते.

अंतिम सामन्यात विजय मिळल्यानंतर रविंद्र जडेजा म्हणाला की माझा फलंदाजीचा आकडा असा आहे की, खेळाच्या शेवटी मी एकतर हिरो असतो किंवा शून्य असतो. सुदैवाने केएल आणि हार्दिकने त्या भागीदारीत चांगली कामगिरी केली. या दोन्ही जोडागोळीच्या खेळीने सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने झाला,असं त्याने म्हटलं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+