पंतप्रधान मोदींनी रोहितला विचारलं खेळपट्टीची माती का खाल्ली,सांगितले 'हे' कारण
मुंबई- टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय संघ मायदेशी परतला आहे. ट्रॉफीसह भारतीय संघाला पाहण्यासाठी भारतीयांनी उत्स्फुर्त गर्दी केली होती. गुरुवारी भारतीय संघ प्रथम दिल्लीत दाखल झाला. जिथे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारतीय खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बराच वेळ चर्चा केली.

या संभाषणाचा व्हिडिओ एएनआयने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्णधार रोहित शर्माला मातीची चव का घेतली, असे विचारताना दिसत आहेत. 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकून रोहित शर्माने तिथली माती चाखली होती. ज्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना प्रश्न केला.
रोहितने हे दिले उत्तर..
#WATCH | During his interaction with PM Modi, Team India captain Rohit Sharma said, "...we all had waited a lot for this, worked very hard for this. Many times we came very close to winning the World Cup, but we could not move forward, but this time because of everyone we were… pic.twitter.com/h6uwlOaLnC
— ANI (@ANI) July 5, 2024
पंतप्रधान मोदींच्या प्रश्नाचे उत्तर देताना रोहितने सांगितले की, असे करण्यामागे एक खास कारण आहे. तो म्हणाला की, जेव्हा मी खेळपट्टीवर गेलो तेव्हा मला तो विश्वविजेतेपणाचा क्षण दिसत होता. त्या खेळपट्टीने आम्हाला हे बक्षिस दिला. आम्ही त्या खेळपट्टीवर खेळलो आणि जिंकलो. ते मैदान मला आयुष्यभर लक्षात राहील. आणि म्हणूनच मला त्याचा एक तुकडा माझ्याजवळ ठेवायचा होता.
त्या 'स्लो मोशन'चाही खुलासा
रोहितने माती चाखण्याबाबतचा खुलास केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोहित शर्माला ट्रॉफी स्वीकारताना केलेल्या स्लो मोशन चालीबद्दल आणि डान्सबद्दलही प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना रोहित म्हणाला की, ट्रॉफी स्वीकारताना वेगळ्या शैलीत ट्रॉफीकडे जा, ही कल्पना कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहलची होती. संघातील बाकीच्या खेळाडूंनाही मी काहीतरी वेगळं करावं असं वाटत होतं, म्हणून मी तसं केलं.












Click it and Unblock the Notifications