पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाशी मारल्या गप्पा, व्हिडीओ आला समोर
नवी दिल्ली : T20 विश्वचषक स्पर्धा जिंकून टीम इंडिया आज पहाटे मायदेशी परतली. यानंतर टीम इंडियाचे सर्व खेळाडू, प्रशिक्षकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. टीम इंडिया आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यानचा व्हिडीओ आता समोर आला आहे. यामध्ये नरेंद्र मोदी यांनी विश्वचषक ट्रॉफी आणि सर्व खेळाडूंसह फोटो काढला.

तसेच विश्वचषकातील काही आठवणी नरेंद्र मोदी सांगताना टीम इंडियाचे खेळाडू व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
PM Modi meets victorious ICC T20 World Cup team at his residence
— ANI Digital (@ani_digital) July 4, 2024
Read @ANI Story | https://t.co/IzJiemYNjJ #TeamIndia #PMModi #IndianCricketTeam #T20WorldChampion pic.twitter.com/2u8xr3dO9k
टीम इंडियाच्या खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 7 लोक कल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मोदींनी टीम इंडियाच स्वागत करताना त्यांचं भरभरुन कौतुकही केले. जवळपास तासभर मोदींनी खेळाडूंशी चर्चा केली.
#WATCH | Indian Cricket team meets Prime Minister Narendra Modi at 7, Lok Kalyan Marg.
— ANI (@ANI) July 4, 2024
Team India arrived at Delhi airport today morning after winning the T20 World Cup in Barbados on 29th June. pic.twitter.com/840otjWkic
टीम इंडियाचे सर्व खेळाडू मोदींना भेटण्यासाठी भारतीय संघाच्या गणवेशात पोहोचले होते. मोदींची भेट घेतल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू मुंबईसाठी रवाना झाली आहे. मुंबईत टीम इंडियाची विजयी यात्रा काढण्यात येणार आहे. टीम इंडिया वानखेडे स्टेडियमवरही जाईल. याठिकाणी भारतीय संघाच्या स्वागतासाठी जंगी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या चार खेळाडूंचा मुंबईत होणार सन्मान
दरम्यान मुंबईत महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यादरम्यान भारतीय संघांचे मुंबईतील खेळाडू रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या (5 जून रोजी) भेट घेणार आहे. यावेळी विधीमंडळाच्या सभागृहात या खेळाडूंचा खास सत्कार करण्यात येणार आहे. यासंदर्भात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी याबाबत आज माहिती दिली. यासंबंधीचे निमंत्रण या खेळाडूंना देण्यात आलं आहे . यावेळी सर्व पक्षाचे आमदार उपस्थित रहावे यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे विनंती करणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.
मुंबईत होणार जंगी स्वागत
टीम इंडियाचे खेळाडू आज दुपारी 4 पर्यंत मुंबईत येतील. त्यानंतर त्यांची मुंबईत भव्य विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. टीम इंडियाची विजयी मिरवणूक नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम दरम्यान काढण्यात येणार आहे. डबल डेकर ओपन डेक बसमधून ही मिरवणूक काढण्यात येणार आहे. या बसवर वर्ल्ड कप विजयी संघांचे स्टीकर लावण्यात आले आहेत.
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications