PBKS vs RCB : ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला 'हा' बॅट्समन, टाॅप 5 मध्ये 4 भारतीय खेळाडू, पुर्ण यादी वाचा
PBKS Kings vs RCB : आयपीएलची सांगता 3 जून रोजी अंतीम सामन्याने झाली. या सामन्यात पंजाबवर राॅयल चॅलेंजर बंगळुरूने विजय मिळवत आयपीएल ट्राॅफीवर आपले नाव कोरले. या विजयाने तब्बल अठरा वर्षांची प्रतिक्षा संपवत आरसीबीने आयपीएल ट्राॅफी दिमाखात उंचावली.
आयपीएलच्या 18 व्या हंगामात ऑरेंज कॅपच्या शर्यतीचा नाट्यमय टप्पा खूपच रोमांचक होता, परंतु अंतिम सामन्यानंतर भारताच्याच चार आणि एका विदेशी खेळाडूंमध्ये स्पर्धा रंगली, अखेर या पाचमध्ये एक भारतीय खेळाडू अव्वल स्थानावर राहिला आणि त्याच्या डोक्यावर दिमाखात आयपीएलची ऑरेंज कॅप ठेवली गेली.

कोणी मिळवला ऑरेंज कॅपचा मान
आयपीएल 2025 च्या ऑरेंज कॅपचा मान साई सुदर्शनने मिळवला आहे. गुजरात टायटन्सच्या या सलामीवीर फलंदाजाने 15 सामन्यांमध्ये 54.21 च्या सरासरीने एकूण 759 धावा केल्या आहेत. त्याच्या सातत्याने उत्कृष्ट फलंदाजीमुळे तो ऑरेंज कॅपचा हक्कदार बनला.
दुसऱ्या क्रमांकावर कोण?
संपूर्ण हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप पुरस्कार दिला जातो. या हंगामात, साई सुदर्शनने केवळ त्याच्या संघासाठी महत्त्वाचे धावा केल्या नाहीत तर त्याने वैयक्तिकरित्याही चमकदार कामगिरी केली आहे. दुसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव आहे, ज्याने 16 सामन्यांमध्ये 717 धावा केल्या आहेत आणि त्याची सरासरी 65.18 आहे. पण त्याने साई सुदर्शनपेक्षा एक सामना या आयपीएलमध्ये जास्त खेळला आहे, तरीही तो मागे राहीला.
तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली
तिसऱ्या क्रमांकावर आरसीबीचा दिग्गज खेळाडू विराट कोहली आहे, त्याने 15 सामन्यांमध्ये 657 धावा केल्या आहेत. त्याची फलंदाजीही खूप चांगली होती, परंतु ऑरेंज कॅपसाठी ही संख्या पुरेशी नव्हती. जरी तो ऑरेंज कॅपचा मानकरी नसला तरीही त्याने संघाला फलंदाजीच्या जोरावर ट्राॅफी जिंकून देण्यात हातभार लावला आहे.
चौथ्या क्रमांकावर कोण?
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल हा आयपीएलमध्ये फलंदाजीत चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे. एकवेळ तो पहिल्या व नंतर साई सुदर्शननंतर दुसऱ्या क्रमांकावर होता. गिलने 15 सामन्यांमध्ये 650 धावा केल्या आहेत.
पाचव्या क्रमांकावर कोण?
टाॅप पाच फलंदाजात पाचव्या क्रमांकावर लखनऊ सुपर जायंट्सचा मिचेल मार्श हा आहे. त्याने 13 सामन्यांमध्ये 627 धावा केल्या, आहेत या संघाची घौडदौड प्ले-ऑफ सामन्याआधीच संपली त्यामुळे त्याला 13 सामनेच खेळता आले.
18 वर्षांची प्रतिक्षा संपली
आरसीबी चॅम्पियन बनला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) ने अखेर 18 वर्षांची प्रतीक्षा संपवत आयपीएलचे विजेतेपद जिंकले. विराट कोहली सुरुवातीपासूनच आरसीबी संघासोबत आहे. यावेळी आरसीबी पहिल्यांदाच चॅम्पियन ठरला. हा विजय विराट कोहलीच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा क्षण ठरला. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 9 गडी गमावून 190 धावा केल्या. विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली आणि संघाच्या इतर फलंदाजांनीही आपली भूमिका बजावली. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जचा संघ 184 धावाच करु शकला.












Click it and Unblock the Notifications