मोठी बातमी! भारतानेच नाही, तर अभिषेक शर्मानेही इंग्लंडला 37 धावांनी हरवले; कसे तर वाचा...

अभिषेक शर्माच्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने पाचव्या टी-२० सामन्यांत इंग्लंडचा १५० धावांनी पराभव केला. अभिषेक या सामन्यात १३५ धावांची धुव्वाधार खेळी केली. अभिषेक शर्मा फक्त शतक झळकावून थांबला नाही, तर त्याने एकाच षटकात २ विकेट्स घेत विक्रम केला. मोहम्मद शमीने ३ विकेट्स घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दणक्यात पुनरागमन केले.

India England T20 series

इंग्लंडचा ९७ धावांतच खुर्दा

भारताने दिलेल्या २४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अवघ्या ९७ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून एकट्या अभिषेक शर्माने १३५ धावांची वादळी खेळी केली. इंग्लंडचे ११ खेळाडूही १३५ धावांचा टप्पा गाठू शकला नाही. १०० धावांच्या आतच इंग्लिश संघ सर्वबाद झाला. अशारितीने अभिषेकनेही इंग्लंडचा ३७ धावांनी पराभव केल्याचं म्हटलं गेले.

साँल्टने फिफ्टी करत दिली झुंज

एकीकडे इंग्लंडचा संघ चाचपडत असताना फिलीप सॉल्टने चांगली खेळी केली. त्याने 23 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 55 धावा केल्या. पण त्याची विकेट काढण्यात शिवम दुबेला यश आले. त्यानंतर संपूर्ण सामना भारताच्या पारड्यात झुकला. त्याच्याशिवाय इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. भारताने पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 ने जिंकली. 2012 पासून या दोन्ही संघात टी20 मालिका होत आहेत. पण तेव्हापासून टीम इंडिया प्रत्येक वेळी इंग्लंडवर भारी पडली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+