Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

2024 मध्ये T-20 वर्ल्ककप जिंकून भारताने 13 वर्षांची प्रतीक्षा संपवली, SAकडून कसा हिसकावला होता विजय

Lookback 2024 Sports : T-20 वर्ल्डकप विजयाची 13 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली ती वर्ष 2024मध्ये. रोहित सेनेने दक्षिण आफ्रिकेकडून टी-20 विश्वचषक हिसकावून घेतला. फायनल सामना जिंकला अन् दक्षिण आफ्रिकेला चारीमुंड्या चित केले होते. चला तर जाणून घेऊया, टी-20 फायनलमध्ये कसा रंगला होता थरार अन् भारताने कसा मिळविला होता विजय.

रोहित फायनलमध्ये अपयशी ठरला

संपूर्ण विश्वचषकात दमदार फलंदाजी करणारा रोहित फायनलमध्ये खेळला नाही, पण कोहली मात्र ठाम होता. 76 धावा केल्या. अक्षर आणि शिवमनेही सर्वतोपरी प्रयत्न केले. 177 धावांचे लक्ष्य दिले. दक्षिण आफ्रिका फलंदाजीला आली. 14 षटकांपर्यंत त्यांचे फलंदाज वेगाने विजयाकडे वाटचाल करत होते. यानंतर जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या गोलंदाजीवर परतले आणि भारताने सामन्यात पुनरागमन केले. सूर्यकुमार यादव धावा करू शकला नाही, पण झेल घेऊन सामना फिरवला.

भारताने शेवटच्या षटकापर्यंत झुंज देत विजय खेचून आणला. 177 धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा संघ 169 धावांवर थांबला. 7 धावांनी पराभूत. 32 वर्षांपासून चोकर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा संघ यावेळीही डाग घेऊन परतला.

Lookback 2024 Sports

मॅन ऑफ द मॅच ठरला विराट कोहली

टी-२० सामन्याचाय फायनलपूर्वी झालेल्या सामन्यांमध्ये विराटने 7 सामन्यात एकूण 75 धावा केल्या होत्या. तर दुसरीकडे फायनलमध्येच एकट्याने त्याने 76 धावा केल्या. पॉवरप्लेमध्येच भारताने रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यांच्या विकेट्स गमावल्या होत्या. विराटने सर्वाधिक धावा 176 धावा केल्या. त्यामुळे रनमशीन अशी त्यांची ओळख त्याने शेवटच्या सामन्यात कायम ठेवली होती.

विजयाचे कोण ठरले होते खरे नायक?

या सामन्यात विजयाचे खरे नायक कोण असा प्रश्न कायम विचारला जातो. परंतु, कप्तान रोहित शर्मा म्हणाला की, हा विजय एकीचा होता. तरी देखील विचार केला तर अक्षरला रोहित शर्माने हार्दिक पांड्या आणि शिवम दुबेच्या आधी फलंदाजीसाठी पाठवले होते. विकेटची काळजी घेण्याची जबाबदारी दिली आणि अक्षरने तेच पार पाडले. 5 व्या षटकात 3 विकेट पडल्या आणि 15 व्या षटकात बाद झाले, तेही दुर्दैवाने. धावांसाठी धावला आणि बाद झाला. पण त्याआधी त्याने 47 धावांची इनिंग खेळली आणि 4 षटकार ठोकले.

हार्दिक पांड्याने फलंदाजीत फक्त 5 धावा केल्या, पण चेंडूने आश्चर्यकारक कामगिरी केली. 27 चेंडूत 52 धावा करणाऱ्या हेनरिक क्लासेनची विकेट घेतली. शेवटच्या षटकात 12 धावांची गरज असताना डेव्हिड मिलर आणि कागिसो रबाडा बाद झाले.

दुसरा विजयाचा शिलेदाराचा विचार केला तर तो आहे जसप्रीत बुमराह. जसप्रीतने आफ्रिकेची पहिली विकेट घेतली. सलामीवीर रीझा हेंड्रिक्स दुसऱ्याच षटकात बोल्ड झाला. यानंतर, 16 व्या षटकात त्याचे पुनरागमन झाले, जेव्हा सामना दक्षिण आफ्रिकेच्या कोर्टात होता. 30 चेंडूत 30 धावा हव्या होत्या. बुमराहने केवळ 4 धावा दिल्या. यानंतर तो 18व्या षटकात परतला आणि त्याने फक्त 2 धावा दिल्या. या षटकात मार्को जॅन्सनने गोलंदाजी केली, ती नुसती गोलंदाजी नव्हती तर विजयावर शिक्कामोर्तब झाले. दक्षिण आफ्रिकेने 6 विकेट गमावल्या होत्या.

अर्शदीप सिंगने पॉवरप्लेच्या आत कर्णधार एडन मार्करामला बाद केले. आपल्या अर्धशतकाकडे वाटचाल करणारा सलामीवीर डी कॉक बाद झाला. अर्शदीपने 4 षटकात फक्त 20 धावा देत 2 बळी घेतले. डी कॉकची विकेट भारतासाठी मोठे यश मानली जात होती.

कशामुळे मिळाला होता विजय

भारताच्या 2 मोठ्या भागीदारीचा या विजयात महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे. विराट कोहली पहिल्या षटकात फलंदाजीला आला आणि 19 व्या षटकापर्यंत तिथेच राहिला. 76 धावा केल्या. या खेळीशिवाय दोन भागीदारी झाल्या ज्यामुळे धावसंख्या 176 पर्यंत पोहोचली. कोहलीने प्रथम अक्षर पटेलसोबत 72 धावांची भागीदारी केली, त्यानंतर शिवम दुबेसोबत 57 धावांची भागीदारी केली.

भारतीय वेगवान गोलंदाजांनी शेवटच्या 4 षटकांमध्ये खेळ बदलला. बुमराह, अर्शदीप आणि पांड्या या त्रिकुटाने मिळून 7 विकेट घेतल्या. या तिघांनी शेवटच्या 5 षटकात 30 धावा होऊ दिल्या नाहीत. बुमराहने पुढच्या 2 षटकात 6 धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. हार्दिकने 2 षटकात 12 धावा दिल्या आणि 3 बळी घेतले. अर्शदीपने एक षटक टाकत 4 धावा दिल्या. या षटकांनी सामना जिंकला.

मॅचमध्ये कसा राहिला टर्निंग पॉईंट

क्लासनची विकेट : अक्षर 15 वे षटक टाकण्यासाठी आला, हेनरिक क्लासनने 6 चेंडूत 24 धावा केल्या. यानंतर त्याने बुमराहच्या षटकात एकल घेत 50 धावा पूर्ण केल्या. आता विजयासाठी 24 चेंडूत फक्त 26 धावा हव्या होत्या. हार्दिक 17 व्या षटकात आला आणि त्याने पहिल्याच चेंडूवर क्लासेनची विकेट घेतली. ही अशी विकेट होती, ज्यानंतर टीम इंडियाच्या विजयाच्या आशा जिवंत झाल्या.

सूर्याचा संस्मरणीय झेल

धोकादायक मिलर बाद झाला दक्षिण आफ्रिकेला 6 चेंडूत 16 धावा करायच्या होत्या आणि डेव्हिड मिलर क्रीजवर होता. हार्दिकने ऑफ स्टंपवर लो फुल टॉस टाकला. मिलरने एक शॉट खेळला जो सीमारेषेपलीकडे गेला. सूर्यकुमारने बाऊंड्रीबाहेर जाताना कॅच घेतला, चेंडू बाऊन्स केला आणि सीमारेषेच्या आत आल्यावर कॅच पूर्ण केला. त्यामुळे हा विजय अविस्मरणीय राहिला. दक्षिण आफ्रिकेच्या तोंडचा घास पळवला, असा सामना हा झाला होता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+