बुमराह बनला ICCचा 'टेस्ट प्लेयर ऑफ द ईयर'; BGTमध्ये 32 विकेट्स घेतल्या, स्मृती मंधानानेही मारली बाजी
ICC Ranking- jasprit bumrah : भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. या शर्यतीत इंग्लंडचा जो रूट, हॅरी ब्रूक आणि श्रीलंकेचा कामिंदू मेंडिस होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सोमवारी याची घोषणा केली. बुमराह हा हा किताब मिळवणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज आहे. गेल्या वर्षी त्याने 71 विकेट्स घेतल्या.
दुसरीबाब म्हणजे, जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त, अफगाणिस्तानच्या अझमतुल्लाहला वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला आहे.
तसेच, महिला क्रिकेट विश्वात भारताची उपकर्णधार स्मृती मंधाना ही वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू ठरली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) दरवर्षी टी-20, एकदिवसीय आणि कसोटीतील सर्वोत्तम खेळाडूंना सन्मानित करते.

2014 मध्ये 13 कसोटीत 71 बळी
2024 मध्ये खेळल्या गेलेल्या 13 कसोटी सामन्यात बुमराहने 71 विकेट्स घेतल्या. तो भारतासाठी एका कॅलेंडर वर्षात 70 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा चौथा गोलंदाज आहे. त्याच्या आधी रविचंद्रन अश्विन, अनिल कुंबळे आणि कपिल देव यांनी ही कामगिरी केली आहे.
आतापर्यंत, कसोटी क्रिकेटच्या एका कॅलेंडर वर्षात १७ गोलंदाजांनी ७० पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत, परंतु कोणाचीही सरासरी बुमराहच्या १४.९२ च्या बरोबरीची नाही.
बीजीटीमध्ये ३२ विकेट्स घेतल्या, स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला
जानेवारी २०२५ च्या सुरुवातीला संपलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये बुमराहने 32 विकेट्स घेतल्या. त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही घोषित करण्यात आले. 2023 च्या अखेरीस बुमराह पाठीच्या दुखापतीतून परतला. 2024 मध्ये त्याने 13 कसोटी सामन्यात 71 विकेट्स घेतल्या.
या मालिकेदरम्यानच बुमराहने 200 कसोटी बळींचा टप्पा ओलांडला आणि अशी कामगिरी करणारा तो 12 वा भारतीय गोलंदाज ठरला. 31 वर्षीय बुमराह हा कसोटी इतिहासातील सर्वात कमी सरासरीने (19.4) 200 बळी घेणारा एकमेव गोलंदाज आहे.
आफ्रिकेविरुद्ध 8 विकेट्स घेतल्या
2024 मध्ये बुमराहचा संस्मरणीय क्षण म्हणजे केपटाऊनमध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेवरील विजय. बुमराहने सामन्यात 8 विकेट्स घेतल्या आणि भारताने दक्षिण आफ्रिकेला 8 विकेट्सने हरवले.
त्यानंतर बुमराहने इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 19 विकेट्स घेतल्या. ज्यामुळे भारताने 4-1 असा विजय मिळवला.












Click it and Unblock the Notifications