MI Vs RCB: 10 वर्षानंतर वानखेडे स्टेडियमवर RCBने मुंबई इंडियन्सला हरवले; हार्दिक-तिलकची झुंज अपयशी
Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या 20 क्रमांकाच्या सामन्यात आरसीबीने मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी पराभव केला.
हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 5 विकेट्स गमावून 221 धावा केल्या. कोहली आणि रजत पाटीदार यांनी अर्धशतके केली. मुंबईला जिंकण्यासाठी 222 धावा करायच्या होत्या.
पण मुंबईला फक्त 209 धावा करता आल्या. हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा यांनी तुफानी फलंदाजी केली. पण तो त्याच्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
10 वर्षानंतर आरसीबीचा वानखेडेवर विजय
आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत वानखेडे स्टेडियमवर आरसीबीला मुंबई विरुद्ध एकदाच विजय मिळवता आला होता. 2015 मध्ये आरसीबीने मुंबईला हरवले होते. त्यानंतर सलग दहा वर्ष या मैदानावर मुंबईलाच विजय मिळत गेला. परंतु. सोमवारी (दि.7) आरसीबीने तब्बल दहा वर्षानंतर मुंबई इंडियन्सचा पराभव केला. त्यामुळे मुंबईचा त्यांच्याच मैदानावर निराशाजनक पराभव स्वीकारावा लागला. दुसरे म्हणजे कृणालने मुंबईच्या चार विकेट्स घेतल्याने मुंबईला हात टेकवावे लागले.

अशी होती आरसीबीची खेळी
- प्रथम फलंदाजी करताना आरसीबीची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ट्रेंट बोल्टने फिल सॉल्टला आपला बळी बनवले.
- पण यानंतर विराट कोहलीने एक धमाकेदार खेळी केली. देवदत्त पडिकल देखील फॉर्ममध्ये दिसत होता. तथापि, पडिक्कल 37 धावा करून 9 व्या षटकात बाद झाला.
- यानंतर विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली. पण 15 व्या षटकात हार्दिक पंड्याने कोहली आणि लियाम लिव्हिंगस्टोन दोघांनाही बाद केले.
- विराट कोहलीने 42 चेंडूत 67 धावा केल्या. पण यानंतर रजत पाटीदारने शानदार फलंदाजी केली. पाटीदारने 32 चेंडूत 64 धावा केल्या, ज्यामुळे आरसीबीने 5 विकेट्स गमावल्यानंतर मुंबईला 222 धावांचे लक्ष्य दिले.
अशा पडल्या मुंबईच्या विकेट्स
- 222 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्माने निश्चितच काही चांगले शॉट्स खेळले पण तो दुसऱ्याच षटकात 17 धावा काढून बाद झाला.
- यानंतर, चौथ्या षटकात रॅकल्टनही बाद झाला. त्याच्या बॅटमधून फक्त १७ धावा आल्या. यानंतर सूर्यकुमार यादवने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण तोही १२ व्या षटकात बाद झाला. सूर्याच्या बॅटमधून २८ धावा आल्या.
- यानंतर हार्दिक पांड्या आणि तिलक वर्माचे वादळ आले. दोघांनीही तुफानी फलंदाजी केली. हार्दिकने १५ चेंडूत ४२ धावा केल्या, तर तिलकने २९ चेंडूत ५६ धावा केल्या.
- एकेकाळी असे वाटत होते की मुंबई हा सामना सहज जिंकेल. पण भुवीने सामना उलटा केला. अखेर मुंबई संघाला फक्त २०९ धावा करता आल्या.












Click it and Unblock the Notifications