Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

हार्दिक पांड्याचे कर्णधारपद जाणार? 'त्या' एका कृतीमुळे आकाश अंबानी संतापला; नेमके काय झाले? वाचा...

सध्या जगभर आयपीएल २०२५ ची धूम सुरु आहे. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सची (एमआय) खराब कामगिरी सुरूच असल्याचे दिसत आहे. या हंगामात मुंबई संघाने त्यांचे तिन्ही सामने गमावले आहेत. शुक्रवारी लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध मुंबईला १२ धावांनी पराभव पत्करावा लागला. मुंबई हा सामना जिंकेल असे वाटत असताना शेवटच्या २ षटकांत लखनौच्या गोलंदाजांच्या शानदार गोलंदाजीपुढे मुंबईने नांगी टाकली. या सामन्यांत कर्णधार हार्दिक पंड्याच्या एका कृतीने संघाचा मालक आकाश अंबानी चांगलाच संतापलेला दिसला. आकाश अंबानीचा हाच संताप सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Akash Ambani reaction video

अंबानीच्या रागाचे काय होते कारण?

मुंबई इंडियन्स हा सामना सहज जिंकेल अशी स्थिती होती. परंतु शेवटच्या दोन षटकांत होत्याचे नव्हते झाले. मुंबई इंडियन्सला शेवटच्या ६ चेंडूत २२ धावांची गरज होती. लखनौचा कर्णधार ऋषभ पंतने आवेश खानकडे चेंडू सोपवला. हार्दिकने हिल्या दोन चेंडूत दोन चौकार ठोकत आठ धावा केल्या. त्यावेळी चार चेंडूत १४ धावांची गरज होती. तिसऱ्या चेंडूवर धावा निघत असताना हार्दिकने धाव घेतली नाही. नॉन-स्ट्राइकवर उभा असलेला मिचेल सँटनरला त्याने अर्ध्या क्रिजवरुन परत पाठवले. धोनीची हीच स्टाईल मालक आकाश अंबानीला आवडली नाही. त्याला प्रचंड राग आला.

तोच क्षण पराभवाचे कारण

तिसऱ्या चेंडूवर एकही धाव न घेतल्यामुळे मुंबईला फटका बसला. चौथ्या चेंडूवर आवेश खानने एक शानदार यॉर्कर टाकला. त्यावरही पंड्याला धाव घेता आली नाही. आता मुंबईला जिंकण्यासाठी २ चेंडूत १४ धावा करायच्या होत्या. त्या अशक्य होत्या. पुढच्या २ चेंडूंवर फक्त १ धाव करता आली. पंड्याने तिसऱ्या चेंडूवर सँटनरला स्ट्राईक दिला असता, तर त्याला सामना जिंकण्याची किंवा बरोबरीत सोडवण्याची संधी मिळाली असती. पण पंड्याने तसे केले नाही. हार्दिकचा स्वतःवरील आत्मविश्वास कामी आला नाही. दोन डॉट बॉल खेळल्यानंतर मुंबई विजयाच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडली.

अंबानी सोशल मीडियावर व्हायरल

शेवटच्या षटकात पंड्याचा अतिआत्मविश्वास नडला आणि मुंबईचा पराभव झाला. पंड्या धोनी स्टाईल मारायला गेला मात्र ती कामी आली नाही. याच प्रकारामुळे फ्रँचायझी मालक आकाश अंबानी संतापले. आता त्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+