IPL 2025: झहीर खान आणि ऋषभ पंतमध्ये जोरदार वाद, व्हिडिओ व्हायरल
IPL 2025, LSG Vs DC : आयपीएल 2025 मधील 40 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यातील सामन्यादरम्यान एक मोठा वाद समोर आला आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत आणि संघाचे मेंटर झहीर खान यांच्यात बॅटिंग ऑर्डरवरून वाद झाला असल्याचे समोर आले आहेत.
ऋषभ पंतला सातव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याच्या निर्णयाने त्याच्या आणि झहीर खान यांच्यात हा वाद निर्माण झाला असल्याचे बोललं जात आहे. डगआऊटमध्ये पंतचा राग स्पष्ट दिसत होता, ज्यावर माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे आणि सुरेश रैना यांनीही आपली मते व्यक्त केली आहेत. या सामन्यात लखनऊचा 8 विकेट्सने पराभव झाला आहे.

लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील हा सामना 23 एप्रिल 2025 रोजी खेळला गेला. लखनऊने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 159 धावा केल्या, परंतु दिल्लीने हा सामना सहज जिंकला. सामन्यादरम्यान लखनऊच्या फलंदाजी क्रमाने सर्वांचे लक्ष वेधले, विशेषतः कर्णधार ऋषभ पंतला सातव्या क्रमांकावर पाठवण्याच्या निर्णयाने.
सामन्याच्या 12 व्या षटकात निकोलस पूरन बाद झाला तेव्हा लखनऊची धावसंख्या 99/2 अशी होती. त्यावेळी सर्वांना अपेक्षा होती की, पंत फलंदाजीला येईल. परंतु त्याऐवजी अब्दुल समद आणि त्यानंतर डेव्हिड मिलरला पाठवण्यात आले. पंत शेवटी 19 व्या षटकात फलंदाजीला आला, जेव्हा फक्त दोन चेंडू शिल्लक होते. मुकेश कुमारच्या शेवटच्या चेंडूवर पंत शून्य धावांवर बाद झाला आणि त्याचा राग स्पष्टपणे दिसून आला. तो थेट डगआउटमध्ये परतला त्यावेळी तिथे झहीर खानशी वाद झाल्याचे दिसून येत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
embarassing from pant 🤢 https://t.co/pSTn3lkScf pic.twitter.com/snbPkwAIwl
— sᴜɢᴀʀ (@Sugar_Sai_Gill) April 22, 2025
लखनऊ सुपर जायंट्सने सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 159 धावा केल्या. सलामीवीर एडेन मार्करम आणि मिशेल मार्श यांनी चांगली सुरुवात केली होती, परंतु मधल्या षटकांत संघाचा डाव गडगडला. निकोलस पूरन आणि मार्करम बाद झाल्यानंतर लखनऊला वेगाने धावा करता आल्या नाहीत. शेवटच्या 10 षटकांत त्यांना फक्त 72 धावा करता आल्या, जे टी-20 क्रिकेटच्या निकषानुसार कमी आहेत. दिल्ली कॅपिटल्सने अक्षर पटेल आणि केएल राहुल यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर हे लक्ष्य सहज पार केले. लखनऊच्या रणनीतीतील चुका आणि बॅटिंग ऑर्डरमधील बदल यामुळे त्यांना हा सामना गमवावा लागला.
अनिल कुंबळे आणि सुरेश रैना यांच्या प्रतिक्रिया
या सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सवर भाष्य करताना माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळे यांनी या निर्णयावर आपलं मते मांडलं आहे. कुंबळेने म्हटलं आहे की , "जर तुम्हाला कमी दबावात फलंदाजी करायची असेल तर ठीक आहे, पण इतके उशीरा खेळायला येणे हे समजण्यापलीकडचे आहे. पंतचा जो राग दिसत आहे, त्यावरून स्पष्ट होते की त्याच्यावर अन्याय झाला आहे. तो कदाचित वरच्या क्रमांकावर फलंदाजी करू इच्छित होता. हा निर्णय त्याचा होता की प्रशिक्षक जस्टिन लँगरचा, की मेंटर झहीर खानचा? पंत खूपच निराश दिसत होता." कुंबळेने पुढे म्हटलं आहे की, पंतने या परिस्थितीला सकारात्मकतेने घ्यावे आणि आपला राग चांगल्या कामगिरीत रूपांतरित करावा.
माजी किक्रेटपटू सुरेश रैना यांनीही यावर आपले मत मांडले. सुरेश रैना म्हणाला की, "अजून 20 षटके शिल्लक आहेत. तुम्हाला विकेट्स राखायच्या आहेत आणि कर्णधार म्हणून संघाला विजय मिळवून द्यायचा आहे. पंत कदाचित झहीरला म्हणत असेल, 'मी सांगितलं होतं ना, मला लवकर पाठवा.'" रैनाने पंतच्या भावनांना समजून घेतल्या आहेत, परंतु त्यांने ही पंतला सल्ला दिला आहे की, त्याने परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळावी.












Click it and Unblock the Notifications