Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL Auction: अनसोल्ड राहण्याचं दुःख सहन झालं नाही! कोहलीसोबत विश्वचषक जिंकणारा खेळाडूची निवृत्ती

IPL Auction: किक्रेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतातील क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून त्याने निवृत्ती घेतली आहे. 34 वर्षीय सिद्धार्थने टीम इंडियासाठी 3 वनडे आणि 3 टी-20 सामने खेळले आहेत.

सोशल मिडीयावर एका पोस्टमध्ये सिध्दार्थने म्हटलं आहे की, 'आता माझ्यावर क्रिकेट करिअरला विराम देण्याची आणि निवृत्तीची घोषणा करण्याची वेळ आली आहे. "जेव्हा मी लहान होतो आणि पंजाबच्या मैदानात क्रिकेट खेळायचो, तेव्हा मला एक स्वप्न पडले. आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न. 2018 मध्ये देवाच्या कृपेने, मला टी-20 संघात भारताची 75 वा क्रमांकाची कॅप आणि एकदिवसीय संघात 221 क्रमांकाची कॅप मिळाली".

siddarth kaul

विराट कोहलीसोबत विश्वचषक जिंकला

कौलच्या कारकिर्दीतील उल्लेखनीय कामगिरींमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 2008 मध्ये अंडर-19 विश्वचषक जिंकण्याचा समावेश आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून देशांतर्गत सर्किटमध्ये पंजाबच्या पांढऱ्या चेंडू संघांचे एक नियमित वैशिष्ट्य आहे. ज्यामध्ये 2023-24 हंगामातील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मोहिमेतील विजयाचाही समावेश आहे. ज्यामध्ये तो संघातील सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला. 10 सामन्यात 16 विकेट्स मिळवल्या होत्या. गेल्या वर्षीच्या विजय हजारे ट्रॉफीमध्येही कौल संघासाठी अव्वल स्थानावर राहिला.

कौलच्या नावावर एकूण 297 विकेट

कौलने या वर्षाच्या सुरुवातीला नॉर्थहॅम्प्टनशायरसाठी तीन काउंटी चॅम्पियनशिप गेम आणि सध्याच्या रणजी ट्रॉफी मोहिमेतील दोन गेम खेळले होते. परंतु त्या दोन्ही गेममध्ये त्याला कोणतेही विकेट मिळवता आली नाही. त्याने आतापर्यंत एकूण 88 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 26.77 च्या सरासरीने 297 बळी घेतले आहेत.

आयपीएलमध्ये 3 फ्रँचायझींसाठी खेळला

सिध्दार्थने दिल्ली डेअरडेव्हिल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या तीन फ्रँचायझींसाठी 55 आयपीएल सामनेही खेळले आहेत. 2017 आणि 2018 या हंगामात SRH साठी 37 बळी घेतले आहेत. त्यामुळे 2018 मध्ये भारताच्या यूके दौऱ्यासाठी राष्ट्रीय संघात त्याची निवड करण्यात आली.

आयपीएल लिलावात बोलीसाठी कोणताही संघ पुढे आला नाही

सिध्दार्थने भारताच्या विजयी आशिया चषक मोहिमेत देखील भाग घेतला आणि फेब्रुवारी 2019 मध्ये भारतासाठी त्याचे शेवटचे सहा सामने खेळले. नुकत्याच झालेल्या IPL मेगा लिलाव 2025 मध्ये त्याच्यावर बोली लावण्याकरिता कोणताही संघ पुढे आला नाही. त्यामुळेच त्याने क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला असावा, हे देखील कौलच्या निवृत्तीचे प्रमुख कारण मानले जाते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+