Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ind Vs WI Match : संजू सॅमसनचे वादळ अन् भारताची सेमीफायनलमध्ये धडक! वेस्ट इंडिजचा थरारक पराभव

India vs West Indies T20 World Cup 2026 : कोलकाता येथील ऐतिहासीक ईडन गार्डन्सच्या मैदानावर पार पडलेल्या टी-20 विश्वचषकाच्या 'सुपर 8' फेरीतील सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर 5 गडी राखून विजय मिळवला आहे.

या विजयासह टीम इंडियाने दिमाखात उपांत्य फेरीत (Semi-final) प्रवेश केला असून आता 5 मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताचा सामना टीम इंग्लंडशी होणार आहे.

India vs West Indies T20 World Cup

कॅरिबियन पॉवर-हिटर्सचा धमाका

भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. डावाच्या सुरुवातीला रोस्टन चेसने (40 धावा) आणि शाई होपने (32 धावा) संयमी खेळी करत डावाचा पाया रचला. मात्र, खरा थरार शेवटच्या षटकांत पाहायला मिळाला.

जेसन होल्डरने अवघ्या 22 चेंडूत नाबाद 37 धावा कुटल्या, तर कर्णधार रोवमन पॉवेलने 19 चेंडूत 34 धावांची नाबाद खेळी केली.

या दोघांच्या स्फोटक भागीदारीमुळे वेस्ट इंडिजने 20 षटकांत 195 धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून केवळ जसप्रीत बुमराहने भेदक मारा करत 2 बळी घेतले, तर हार्दिक पंड्या आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी 1 बळी मिळाला, पण ते महागडे ठरले.

भारताची सुरुवात खराब अन् सॅमसनचा संयम!

196 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर अभिषेक शर्मा (10) आणि इशान किशन स्वस्तात बाद झाले. कर्णधार सूर्यकुमार यादवही 18 धावांवर माघारी परतल्याने भारतीय संघ अडचणीत सापडला होता. 12 षटकांत भारताची स्थिती 3 बाद 104 अशी होती.

त्यानंतर तिलक वर्माने 15 चेंडूत 27 धावांची आक्रमक खेळी करत धावगती कायम राखली. हार्दिक पंड्या (17 धावा) बाद झाल्यानंतर सामन्यात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. भारताला शेवटच्या 10 चेंडूत 17 धावांची गरज होती.

संजू सॅमसन ठरला विजयाचा शिल्पकार

एका बाजूने विकेट्स पडत असताना संजू सॅमसनने मात्र मैदानाचा ताबा घेतला होता. सॅमसनने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळींपैकी एक साकारली. त्याने अवघ्या 50 चेंडूत 12 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 97 धावा कुटल्या.

शेवटचा थरार : शिवम दुबेने दोन महत्त्वाचे चौकार मारून भारताला विजयाच्या समीप आणले.

विजयी फटका : शेवटच्या षटकात भारताला 7 धावांची गरज होती. सॅमसनने पहिल्याच चेंडूवर उत्तुंग षटकार मारून वेस्ट इंडिजच्या आशा धुळीस मिळवल्या आणि त्यानंतर चौकार मारून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

भारताचा नवा इतिहास

या विजयासह भारताने सहाव्यांदा टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा मान मिळवला आहे. संजू सॅमसनच्या या धडाकेबाज खेळीने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली असून, आता संपूर्ण देशाचे लक्ष 5 मार्च रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड महामुकाबल्याकडे लागले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+