IND vs PAK: भारत-पाक सामन्याचे तिकीटे काही क्षणात संपली, सर्वात महागडे तिकीट कितीला ?
IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना जगात कुठेही झाला तरी काही फरक पडत नाही. या सामन्यासाठी क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता असते. भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भाग घेणार आहे. दोन्ही संघांमधील सामना दुबईमध्ये खेळवले जाणार आहेत.
या सामन्याच्या तिकिटांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. तिकीट विक्री सुरू होताच प्रेक्षकांनी तिकीट खरेदी करण्यासाठी एकच झुंब्बड उडाली आहे. या सामन्याची तिकिटे क्षणार्धात विकली गेली आहेत.

सर्वात स्वस्त तिकिटे लगेचच विकली गेली, त्यानंतर चाहत्यांना महागड्या तिकिटांसाठी वाट पहावी लागली. प्रीमियम तिकीट 2000 दिरहमला विकले जात होते. याशिवाय प्लॅटिनम तिकिटाची किंमत 5000 रुपये होता, ज्यामध्ये ग्राउंड लाउंजचाही समावेश होता. सर्व तिकिटे काही क्षणातचं विकली गेली आहेत. यावरुन भारत-पाक सामन्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे.
भारत-पाक सामना कधी आहे?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 23 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी प्रेक्षकांची क्रेझ किती आहे याचा अंदाज तिकिट विक्रीवरुन लावला जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत-पाक यांच्यातील सामने दुबई येथे खेळवले जाणार आहेत.
भारत विरुद्ध पाकिस्तान: अंतिम सामन्यासाठी अट
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आठ संघांचा समावेश असणार आहे. या सामन्याची सुरुवात 19 फेब्रुवारीला सुरुवात होणार असून 9 मार्चपर्यंत चालणार आहे. यामध्ये एकूण 15 सामने खेळवले जातील. काही सामने पाकिस्तामध्ये खेळले जातील तर काही सामने दुबईच्या शहरांमध्ये होणार आहेत. जर टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचली तर अंतिम सामनाही दुबईमध्येच खेळला जाईल.
पाकिस्तानमध्ये, लाहोर, कराची आणि रावळपिंडी येथे चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामने होणार आहेत. या स्पर्धेची सुरुवात कराचीतील पहिल्या सामन्याने होईल. यामध्ये गतविजेत्या पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी होईल. पाकिस्तान संघाने शेवटचे 2017 मध्ये अंतिम सामन्यात भारताला हरवून विजेतेपद जिंकले होते.












Click it and Unblock the Notifications