Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ind vs Ban : फायनलसाठी भारत-बांगलादेशमध्ये 'करो या मरो'ची लढत, आजचा सामना कधी, कुठे आणि कसा पाहाल?

India vs bangladesh asia cup 2025 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे टशन अजूनही कायम असतानाच आता सुपर फोरच्या सामन्यातील आणखी एक मोठा सामना आज होणार आहे. यामध्ये भारत बांगलादेशविरुद्ध लढणार असून फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी हा सामना उभय संघांना करो या मरो असा आहे. या सामन्यात आता कोण जिंकणार कोण हरणार याची समि‍करणंही पुढे येत आहेत.

आशिया कप २०२५ च्या सुपर फोरमधील दुसरा महत्त्वाचा सामना आज दुबईमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात रंगणार आहे. दोन्ही संघ दमदार कामगिरीसह मैदानात उतरत असून, दोन्ही संघांनी अद्याप एकही सामना हरलेला नाही. तुर्त भारतीय संघ पाकिस्तानला हरवून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे तर बांगलादेशनेही विजयाची मालिका सुरुच ठेवलेली आहे.

India vs bangladesh asia cup 2025

कशी आहे खेळपट्टी?

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी सुरुवातीच्या सामन्यांमध्ये संथ होती, पण सुपर फोरमध्ये ती अधिक फलंदाजांना अनुकूल दिसत आहे. नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करु शकतो कारण या सामन्यात नंतर ही खेळपट्टी फलंदाजी करणाऱ्या संघाला अनुकूल दिसते आणि विजयश्री मिळवण्यातही सहाय्य करु शकते.

Take a Poll

भारतीय संघाचे मजबुत दुवे..

भारतीय संघाची खरी ताकद त्यांची फिरकी गोलंदाजी आहे. एकीकडे कुलदीप यादव जबरदस्त फार्ममध्ये आहे तर वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल हेही हिसका दाखवण्यात माहीर आहे. आठ- दहा षटकांमध्ये प्रतिस्पर्धकांना या गोलंदाजांनी जास्त धावा काढू दिलेल्या नाही. तसेच, फलंदाजीत अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी पॉवरप्लेमध्येच आक्रमक सुरुवात करण्याची क्षमता दाखवली आहे, यामुळे भारतीय संघ बलाढ्य दिसतो.

बांगलादेशची रणनीती काय आहे?

बांग्लादेश भारतीय फिरकीपटूंची गोलंदाजी फोडून काढण्याचा विचार करत आहे, कारण भारताला कडवी झुंज देण्यासाठी बांगलादेशला भारतीय फिरकीपटूंना प्रभावीपणे सामोरे जावेच लागणार आहे कारण पराभवासाठी हे फिरकीपटू कारण ठरु शकतात. भारताच्या विकेट्स लवकर बाद करण्यावर तसेच पाॅवर प्ले मध्ये धावा कमी निघाव्या यासाठी बांग्लादेश भारतावर दबावाची रणनिती अवलंबू शकतो.

हेड-टू-हेड रेकॉर्ड : India vs bangladesh asia cup 2025 (T20I)

आतापर्यंतची आकडेवारी पाहता भारताचे पारडे जड आहे, पण बांगलादेशला कमी लेखून चालणार नाही, भारतासारखेच विजयाचे प्रबळ दावेदार हा संघ आहे, गेल्या सामन्यात श्रीलंकेला हरवल्यानंतर या संघाचा आत्मविश्वास अधिक वाढवला आहे. हा सामना अपेक्षेप्रमाणे रोमांचक स्थितीत जाईल असे वाटते.

भारत आणि बांग्लादेश यांच्यात एकूण १७ सामने झाले त्यापैकी १६ सामने भारतीय संघाने जिंकले तर १ सामना बांग्लादेश संघाने जिंकले आहेत. त्यामुळे भारताच्या विजय टक्केवारी ९४.१% इतकी तर ५.१% ची इतकी टक्केवारी बांगलादेशच्या विजयाची आहे.

India vs bangladesh asia cup 2025 सामना कधी आणि कुठे पाहणार?

स्थळ: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

वेळ: संध्याकाळी ७:३० (IST)

थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि हॉटस्टार ॲपवर.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+