पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या बाँलर्सचा, शनिवारी टिम इंडियासमोर ऑलआउटचे आव्हान
बॉर्डर- गावसकर ट्रॉफीतील दुसऱ्या कसोटी सामन्याला आज सुरुवात झाली. या पाच दिवशीय सामन्याचा पहिला दिवस यजमान ऑस्ट्रेलियाच्या नावावर राहिला. भारताने टॉस जिंकून पहिली बँटिंग घेतली खरी मात्र संपूर्ण संघ 180 धावांवर ऑलआऊट झाला. यशस्वी जयस्वाल, हर्षित राणा आणि जसप्रीत बुमराह यांना तर भोपळाही फोडता आला नाही. प्रत्युत्तर ऑस्ट्रेलिया संघाने 33 ओव्हर खेळत एक आऊट 86 रन्स केले.

स्टार्कने दिला टीम इंडियाला दणका
भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. परंतु मिचेल स्टार्कने 6 विकेट्स घेत टीम इंडियाचे कंबरडे मोडले. भारताचा पहिला डाव 180 धावांवर आटोपला. टीम इंडियासाठी नितीश रेड्डी याने सर्वाधिक 42 धावांची खेळी केली. केएल राहुल याने 37, शुबमन गिल 31, आर अश्विन याने 22 तर ऋषभ पंत याने 21 धावांचे योगदान दिलं. यशस्वी जयस्वाल, हर्षित राणा आणि जसप्रीत बुमराह या तिघांना भोपळाही फोडता आला नाही. विराट कोहली याने 7, तर कर्णधार रोहितने 3 धावा काढून भारताच्या प्रेक्षकांना निराश केले. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने सहा तर पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलँड या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
That’s Stumps on Day 1
— BCCI (@BCCI) December 6, 2024
Australia trail by 94 runs
Live ▶️ https://t.co/upjirQBOtn#TeamIndia | #AUSvIND pic.twitter.com/dxIG23Ap25
बुमराहने दिला पहिला झटका
ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा आणि नॅथन मॅकस्वीनी यांनी डावाची सुरुवात केली. जसप्रीत बुमराहने 11 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर उस्मान ख्वाजाला आऊट करत ओपनिंग जोडी फोडली. ख्वाजा 35 बॉलमध्ये 13 रन्स करुन आऊट झाला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या फक्त 24 धावा झाल्या होत्या. त्यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत नॅथन मॅकस्वीनी आणि मानर्स लबुशेन या दोघांनी नाबाद 52 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाने 33 ओव्हमध्ये 1 आऊट 86 रन्स केल्या. लबुशेन 67 बॉलमध्ये 3 चौकारांसह 20 रन्सवर नॉट आऊट आहे. तर नॅथन याने 97 चेंडूत 6 चौकारांसह नाबाद 38 धावा केल्या आहेत.
उद्या भारतासमोर आव्हान
ऑस्ट्रेलियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 विकेट गमावून 86 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया 94 धावांनी पिछाडीवर आहे. अशात आता टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर दुसऱ्या दिवशी कांगारुंना मोठी धावसंख्या करण्यापासून रोखण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या कामगिरीकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.












Click it and Unblock the Notifications