Ind Vs Zim : अर्शदीपचा पराक्रम! बुमराह-बोल्टला मागे टाकत रचला इतिहास; सामन्यात तुटले अनेक विक्रम

Ind vs zim t20 world cup 2026 arshdeep singh record : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्ध विजयाचा झंझावात कायम राखला आहे. भारताने केवळ ७२ धावांनी विजयच मिळवला नाही, तर धावांचा डोंगर उभा करून अनेक जागतिक विक्रम मोडीत काढले. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी केली, या जोरावर भारताने सामना खिशात घातला.

"भारतीय फलंदाजांच्या बॅटमधून निघालेल्या धावांच्या वादळात २६ फेब्रुवारी २०२६ रोजी झिम्बाब्वेचा संघ पूर्णपणे उडून गेला. विश्वचषकाच्या इतिहासातील भारताने आपली सर्वोच्च धावसंख्या (२५६ धावा) नोंदवत प्रतिस्पर्ध्यांना चारी मुंड्या चित केले. पण या विजयाचा खरा नायक ठरला तो म्हणजे अर्शदीप सिंग, ज्याने आपल्या वेगाच्या जोरावर बुमराहचा विक्रम मोडीत काढला आणि विश्वचषकात भारताचा नंबर १ गोलंदाज बनण्याचा मान मिळवला."

Ind vs zim t20 world cup 2026

भारताच्या विजयाचे शिल्पकार

१. अर्शदीप सिंग

अर्शदीपने टी-२० विश्वचषकात आतापर्यंत ३५ बळी पूर्ण केले आहेत. त्याने जसप्रीत बुमराह (३३ बळी) आणि न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट (३४ बळी) यांना मागे टाकले आहे. आता तो टी-२० विश्वचषकातील सर्वात यशस्वी डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज बनला आहे.

२. भारताची सलामी, मध्यमफळी फलंदाजी

आजच्या सामन्यात भारताने २५६ धावा केल्या, जे टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील भारताचे सर्वोच्च आणि जगातील दुसरे सर्वोच्च स्कोर आहे.

३. सिक्सर किंग्ज म्हणजे भारतीय फलंदाज

भारतीय फलंदाजांनी एकाच डावात १७ षटकार ठोकले, जो भारतासाठी एक नवीन विक्रम आहे. खास बाब म्हणजे या सामन्यापर्यंत यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारताने ६३ षटकार ठोकले. मागच्या विश्वचषकात भारताने आपलाच विक्रम मागे टाकला. त्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने ६१ षटकार ठोकले होते.

सामन्यातील महत्त्वाचे विक्रम

धावांचा डोंगर: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामन्यात एकूण ४४० धावा झाल्या. हा टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील दुसरा सर्वात मोठा 'एग्रीगेट स्कोर' ठरला आहे.

षटकारांचा पाऊस: या विश्वचषकात भारताने आतापर्यंत एकूण ६३ षटकार मारले आहेत, जे भारतासाठी एकाच स्पर्धेतील सर्वोत्तम प्रदर्शन आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+