Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs PAK : भारत vs पाकिस्तान आज महामुकाबल! फायनल कोण जिंकणार, हेड-टू-हेड रेकॉर्ड काय सांगतो? वाचा

IND vs PAK Final : आशिया कप 2025 थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. क्रिकेट जगतातील सर्वात मोठा आणि रोमांचक सामना आज रंगणार आहे - तो म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फायनल! आजच्या महामुकाबल्याने या स्पर्धेची सांगता होईल आणि दोन्ही संघांपैकी एक संघ आशियाई चॅम्पियन बनेल.

पहलगाम हल्ल्यानंतर आणि त्यानंतर सिंदूर ऑपरेशननंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कटू झाले आहेत. दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध त्वेशाने खेळतात, भारत पाक सामना केवळ एक क्रिकेटचा सामना नाही तर दोन्ही देशांसाठी अस्मितेचा, भावनेचा मुद्दा आहे. या स्पर्धेत भारत आतापर्यंत अपराजीत राहीला आहे, त्यामुळे भारताचा जास्त हक्क आशिया चषकावर आहे आणि तो मिळवण्यासाठी टीम इंडिया पाकिस्तानला नामोहरण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

IND vs PAK Final

आशिया कपमधील भारताचा दबदबा

या संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाने (Team India) जबरदस्त कामगिरी करत आपला दबदबा कायम ठेवला आहे. भारतीय संघाने या आशिया कपमध्ये एकाही सामन्यात पराभवाचे तोंड पाहिले नाही, ज्यामुळे त्यांचे मनोबल उंच आहे. विशेष म्हणजे, भारताने लीग टप्प्यात आणि नंतर सुपर-४ टप्प्यातही पाकिस्तानला दोन वेळा धूळ चारली आहे.

Take a Poll

दुसरीकडे, पाकिस्तान (Pakistan) संघाची कामगिरी संमिश्र राहिली आहे. लीग स्टेजमध्ये एक सामना गमावल्यानंतर ग्रुप स्टेजमध्येही त्यांना हार पत्करावी लागली. बांगलादेशविरुद्धचा विजय वगळता त्यांचा खेळ फारसा प्रभावी नव्हता.

हेड-टू-हेड आकडेवारी: भारताचे पारडे जड!

भारत-पाकिस्तान यांच्यातील टी-२० क्रिकेटमधील (T20 Cricket)हेड-टू-हेड (Head-to-Head) आकडेवारी भारताच्या बाजूने झुकलेली दिसते.

ind vs pak खेळले गेलेले एकूण सामने: १५

भारताने जिंकलेले सामने: १२

पाकिस्तानने जिंकलेले सामने: ३

या आकडेवारीनुसार, टी-२० फॉरमॅटमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला अक्षरशः 'धुऊन' काढले आहे.

ind vs pak आज कोण जिंकणार? (Winner Prediction)

  • आकडेवारी आणि या स्पर्धेतील कामगिरी पाहता, फायनलमध्ये भारतीय संघाचे पारडे निश्चितच जड आहे.
  • भारताने संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहून उत्कृष्ट खेळ दाखवला आहे.
  • या स्पर्धेत पाकिस्तानला दोनदा हरवल्यामुळे भारताचा आत्मविश्वास खूप वाढला आहे.
  • पाकिस्तानचा फलंदाजी क्रम (Batting Order) या स्पर्धेत फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही, हे त्यांच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले.

जर पाकिस्तानी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनीही अप्रतिम आणि एकसंध कामगिरी केली, तरच ते टीम इंडियासाठी आव्हान उभे करू शकतात. अन्यथा, रेकॉर्ड आणि फॉर्म पाहता, आशिया कपची ट्रॉफी भारताच्याच हाती जाण्याची शक्यता सर्वाधिक आहे!

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+