Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs PAK : पाकिस्तानी खेळाडूंचे भर मैदानात घाणेरडं कृत्य! अभिषेक शर्मा संतापला, बॅटनं दिलं उत्तर..

Ind vs pak abhishek sharma on haris rauf shaheen afridi : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील २१ सप्टेंबर २०२५ रोजी झालेला सुपर-४ मधील सामना भारताने शानदाररित्या जिंकला. या सामन्यात भारताच्या सलामीवर फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली. त्यांच्या या जोरावर भारताने सफाईदार विजय मिळवला. या सामन्यातील विजयासह भारत या स्पर्धेच्या अंतीम फेरीत पोहचला आहे. भारताने यापूर्वीही साखळी फेरीत पाकिस्तानवर विजय मिळवला आशिया चषकात पाक भारताविरुद्ध सलग दोनवेळा पराभूत झाला.

Ind vs pak

पराभूत होण्याची चर्चा कमी पण या सामन्यातील हस्तांदोलनाचा मुद्दा आणि स्लेजिंगचा मुद्दा मोठा गाजला. यानंतर पाकिस्ताननेही युएईसोबतच्या साखळी सामन्यापुर्वी नाटकं केली, सामना न खेळण्याची भूमिका घेत त्यांनी ऐनवेळी सामना खेळला. अशा अनेक नाट्यमय घटना या स्पर्धेत घडल्या.

Take a Poll

भारतीय खेळाडूंच्या संयम, आक्रमकतेचा विजय

दरम्यान, काल भारत आणि पाकिस्तान यांच्यातील एशिया कप २०२५ चा सुपर ४ चा सामना दुबईमध्ये खेळला गेला, ज्यामध्ये भारताने शानदार विजय मिळवला. भारताने पाकिस्तानने दिलेले १७२ धावांचे लक्ष्य सहज गाठले. भारतीय फलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे पाकला पुन्हा एकदा पराभवाचे तोंड पाहावे लागले. भारतीय खेळाडूंनी या सामन्यात कमालीचा संयम आणि रणनीती दाखवून हा विजय अधिक महत्त्वाचा बनवला.

या सामन्यात युवा सलामीवीर अभिषेक शर्माने आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. त्याला त्याच्या दमदार खेळीबद्दल 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार मिळाला. त्याने केवळ ७४ धावांची मॅच-विनिंग खेळीच केली नाही, तर मैदानात पाकिस्तानी खेळाडूंशी झालेल्या वादालाही सडेतोड उत्तर दिले.

सामन्यानंतर काय म्हणाला अभिषेक शर्मा?

सामन्यानंतर अभिषेक शर्माने आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त केल्या. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रऊफ आणि शाहीन आफ्रिदी यांच्यासोबत झालेल्या वादाबद्दल त्याने मोकळेपणाने सांगितले. "आजचा दिवस खूपच सरळ होता. ते कोणत्याही कारणाशिवाय आमच्या जवळ येऊन बोलत होते, जे मला अजिबात आवडले नाही. म्हणूनच मी त्यांना फलंदाजीने उत्तर दिले. मला माझ्या संघासाठी चांगली कामगिरी करायची होती," असे अभिषेक म्हणाला.

पाक खेळाडूंचं मैदानात हे कृत्य

अभिषेकच्या म्हणण्यानुसार, तो आणि शुभमन गिल लहानपणापासून एकत्र खेळत आहेत. पाकिस्तानी संघातही पंजाबी बोलणारे अनेक खेळाडू आहेत. व्हिडिओमध्ये खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे स्पष्टपणे दिसत होते. अभिषेकच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट झाले की, विशेषतः आफ्रिदी आणि रऊफ त्याला पंजाबीत शिवीगाळ करत होते, पण त्याने शिवीगाळीला फलंदाजीनेच उत्तर दिले.

मैदानावरील वाद आणि भारताचा विजय

हा वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा अभिषेकने शाहीन आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. त्यानंतर शुभमन गिल आणि हारिस रऊफ यांच्यात वाद झाला. मग अभिषेक स्वतः रऊफशी वाद घालताना दिसला.

भारतीय खेळाडूंनी पुन्हा हस्तांदोलन टाळलं

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना दोन राष्ट्रातील सध्याच्या तणावपुर्ण स्थितीचे प्रतिनिधीत्व करणारा सामना आहे. म्हणूनच यापुर्वीचा आणि काल झालेल्या सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी पुन्हा एकदा पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. या स्पर्धेत ग्रुप स्टेजमधील सामन्यानंतरही भारताने पाकिस्तानशी हात मिळवला नव्हता, ही दुसरी वेळ होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+