IND vs NZ : फायनलमध्ये पावसाचा व्यत्यय येणार का? जाणून घ्या अहमदाबादचा हवामान अंदाज अन् पीच रिपोर्ट
IND vs NZ T20 World Cup 2026 final weather : क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी लढत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. ८ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या या ऐतिहासिक T-20 विश्वचषक फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने उभे ठाकले आहेत.
सूर्यकुमारच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा 7 धावांनी पराभव करून फायनलमध्ये धडक मारली आहे. मात्र, चाहत्यांच्या मनात एकच धाकधूक आहे, आज पाऊस पडणार का?

हवामान अंदाज: पावसाची शक्यता किती?
अहमदाबादमधील क्रिकेट चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. अक्यूवेदरच्या अहवालानुसार, आज पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे.
दिवसभर हवामान : आज सकाळपासूनच वातावरण उष्ण आणि थोडे धुकेयुक्त असेल.
तापमान : दुपारी तापमान ४१°C पर्यंत जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे खेळाडूंना कडाक्याच्या उन्हाचा सामना करावा लागेल.
संध्याकाळची स्थिती : सामन्याच्या वेळी (संध्याकाळी) तापमान २९°C पर्यंत खाली येईल. एकंदरीत, हवामान स्वच्छ राहणार असून संपूर्ण ४० षटकांचा खेळ पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.
खेळपट्टीचा अहवाल (Pitch Report)
नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी नेहमीच फलंदाजांसाठी नंदनवन ठरली आहे. या खेळपट्टीत लाल मातीचे प्रमाण अधिक असल्याने चेंडू बॅटवर चांगल्या गतीने येतो. यामुळे फलंदाजांना मोठे फटके खेळणे सोपे जाते. खेळपट्टीचा नूर पाहता, आजच्या फायनलमध्ये धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रेक्षकांना चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळू शकते.
भारतासमोर 'किवी' आव्हान आणि जुना हिशोब
टीम इंडियासाठी ही फायनल केवळ जेतेपद मिळवण्यासाठी नाही, तर जुने विक्रम मोडण्यासाठीही महत्त्वाची आहे:
इतिहास बदलण्याची संधी : टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारताला अद्याप एकदाही न्यूझीलंडला हरवता आलेले नाही. आज हा दुष्काळ संपवण्याचे भारताचे लक्ष्य असेल.
२०२३ च्या जखमा : याच मैदानावर २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. तो पराभव विसरून नवीन इतिहास रचण्याची संधी आज भारतीय संघाकडे आहे.
न्यूझीलंडचा फॉर्म : न्यूझीलंडचा संघही फॉर्मात आहे. सेमीफायनलमध्ये फिन ॲलनने केवळ ३३ चेंडूत ठोकलेल्या शतकामुळे किवींचे मनोबल उंचावलेले आहे.
टीम इंडियाचा प्रवास
काही आठवड्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारत स्पर्धेबाहेर पडतो की काय, अशी स्थिती होती. मात्र, तिथून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेत भारतीय संघाने फायनल गाठली आहे. इंग्लंडविरुद्धच्या विजयाने टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी आपला फॉर्म सिद्ध केला आहे.












Click it and Unblock the Notifications