Ind Vs NZ फायनलपूर्वी खळबळ! रोहित शर्माचा संजू सॅमसनबद्दल मोठा खुलासा; क्रिकेट जगतात चर्चांना उधाण
Rohit Sharma, IND vs NZ T20 World Cup 2026 Final : टी-20 विश्वचषक 2026च्या अंतिम सामन्याचा थरार आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या महामुकाबल्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मात्र, या हाय-व्होल्टेज सामन्याआधी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधून एक अत्यंत भावूक आणि 'गुप्त' संवाद समोर आला आहे. माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्माने संजू सॅमसनबद्दल केलेल्या एका खुलाशामुळे सध्या क्रिकेट जगतात मोठी खळबळ उडाली आहे.

'दु:खी होऊ नकोस, भाऊ'; रोहितने जपली माणुसकी
स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नव्हते. आयसीसीने शेअर केलेल्या एका विशेष व्हिडिओमध्ये रोहित शर्माने या कठीण काळात संजूशी साधलेल्या संवादाचा उलगडा केला.
रोहित म्हणाला, "मी संजूच्या डोळ्यांतील निराशा पाहू शकत होतो. मी त्याला जवळ घेतले आणि फक्त इतकेच म्हटले- 'दु:खी होऊ नकोस, भाऊ. ही एक मोठी स्पर्धा आहे; संधी कधीही चालून येऊ शकते.'"
रोहितने पुढे सांगितले की, खेळाडूच्या मनात काय चालले आहे हे तो सहज ओळखू शकतो. २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकात स्वतःची निवड न झाल्याची जखम आजही रोहितच्या मनात ताजी आहे. त्यामुळेच, बेंचवर बसलेल्या खेळाडूच्या वेदना त्याला अधिक चांगल्या प्रकारे समजतात.
संजू सॅमसनला सतावत होती 'ती' जुनी भीती
संजू सॅमसनला सर्वात मोठी भीती ही होती की, २०२४ च्या विश्वचषकाप्रमाणे याही वेळी त्याला एकही सामना न खेळता संपूर्ण स्पर्धा बेंचवर बसून काढावी लागेल की काय? मात्र, रोहित शर्माच्या शब्दांनी त्याला धीर दिला. रोहितचे भाकीत खरे ठरले आणि एका महत्त्वपूर्ण सामन्यात संजूला संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत संजूने आपल्या बॅटने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
विजयाची हॅटट्रिक साध्य करणार टीम इंडिया?
भारतीय संघ सध्या यशाच्या शिखरावर आहे. २०२४ चा टी-२० विश्वचषक आणि २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास गगनाला भिडला आहे. आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकून इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. जर भारताने हा सामना जिंकला, तर सलग दोनदा टी-२० विश्वचषक जिंकणारा तो जगातील पहिला संघ ठरेल.
अंतिम सामन्यापूर्वीची आव्हाने आणि रणनीती
विजयाचा रथ सुसाट असला तरी, भारतासमोर काही तांत्रिक प्रश्न कायम आहेत.
अभिषेक शर्माची खराब फॉर्म: अभिषेकने ८ सामन्यांत केवळ ८९ धावा केल्या आहेत, जे चिंतेचे कारण आहे.
वरुण चक्रवर्तीचा प्रभाव : वरुणची जादू या स्पर्धेत म्हणावी तशी चाललेली नाही. मात्र, कर्णधार सूर्याने स्पष्ट केले आहे की, अंतिम सामन्यात वरुणवरच विश्वास टाकला जाईल.
सहाव्या गोलंदाजाची उणीव : अष्टपैलू खेळाडूची कमतरता भासत असली तरी, डेथ ओव्हर्समधील अचूक रणनीतीमुळे भारताने उपांत्य फेरी गाठली आहे.
न्यूझीलंडचे 'हे' दोन खेळाडू ठरणार धोक्याची घंटा
अंतिम फेरीत भारतासमोर सर्वात मोठे आव्हान न्यूझीलंडचे सलामीवीर फिन ॲलन आणि टिम सेफर्ट यांचे असेल. या जोडीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ज्या प्रकारे फटकेबाजी केली, ती पाहता जसप्रीत बुमराहला सुरुवातीच्या ओव्हर्समध्येच आक्रमक गोलंदाजीसाठी पाचारण करावे लागू शकते.
अहमदाबादची खेळपट्टी अन् 'दव' फॅक्टर
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. येथील खेळपट्टी लाल आणि काळ्या मातीचे मिश्रण असल्याने फलंदाजांसाठी नंदनवन ठरू शकते. मात्र, रात्री पडणारे 'दव' (Dew) हा सामन्याचा खरा गेमचेंजर ठरेल. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो, जेणेकरून दुसऱ्या डावात ओल्या चेंडूचा फटका गोलंदाजांना बसणार नाही.












Click it and Unblock the Notifications