ind vs eng : भारत विजयापासून 7 विकेट दूर! इग्लंडला 608 धावांचे टार्गेट, 72 धावांत 3 फलंदाज बाद
ind vs eng 2nd test : भारतीय कर्णधार शुभमन गिलच्या जोरदार दीड शतकाच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी आपला डाव ६ बाद ४२७ धावांवर डाव घोषित केला.
प्रत्युत्तरात इंग्लड संघाने आपल्या दुसऱ्या डावात तीन गडी बाद ७२ धावा केल्या आहेत. चौथ्या दिवशाचा खेळ ५ जुलै रोजी संपला असून आज ६ जुलै रोजी पाचव्या आणि अंतीम दिवसाचा खेळ शिल्लक आहे.

..तर भारत होऊ शकतो विजयी
या पाचव्या दिवशी भारतीय संघाला इंग्लडवर विजयासाठी त्यांचे सात फलंदाज बाद करायचे आहेत. यात टीम इंडिया यशस्वी ठरली तर विजय साकार होऊ शकतो.
दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावातसुद्धा भारताने शानदार फलंदाजी केली आणि कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी झाली. त्याने १६१ धावांची दमदार खेळी केली. त्याच्याशिवाय केएल राहुल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनीही अर्धशतके झळकावून संघाची आघाडी मजबूत केली.
६९ धावा काढल्यानंतर जडेजा शेवटपर्यंत नाबाद परतला. भारताने आता इंग्लंडला विजयासाठी ६०८ धावांचे डोंगरासारखे लक्ष्य ठेवले आहे. गोलंदाजीत, जोश टंग आणि शोएब बशीर यांना इंग्लंडकडून प्रत्येकी दोन बळी मिळाले, तर ब्रायडन कार्स आणि जो रूट यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.












Click it and Unblock the Notifications