Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs BAN : कानपूरमध्ये भारतीय संघाची कमाल, 2 दिवसात सामना जिंकून 2-0 ने मालिका केली नावावर

IND vs BAN: कानपूर कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी टीम इंडियाने पहिल्या सत्रात शानदार गोलंदाजी करत सामन्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. भारतीय संघाने विकेट्स घेत पाहुणा संघ बांगलादेशला बॅकफूटवर आणले आहे. पाहुण्या संघाला बाद करून टीम इंडियाने सामना जिंकला. भारताने मालिका 2-0 ने नावावर केली.

IND vs BAN

अश्विनने दिवसाच्या सुरुवातीलाच भारताला यश मिळवून दिले. त्याने 2 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर मोमिनुल हकला अश्विनकरवी झेलबाद केले. यानंतर शांतो आणि शादमान इस्लाम यांनी मिळून डाव पुढे नेला. यानंतर रवींद्र जडेजाला गोलंदाजीसाठी आणण्यात आले.

95 धावांचे टारगेट 17.2 षटकात केले पूर्ण

पावसाने प्रभावित झालेल्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी भारतासमोर 95 धावांचे लक्ष्य होते, जे भारतीय फलंदाजांनी 17.2 षटकांत पूर्ण केले. यशस्वी जैस्वालने 51 धावा केल्या. कोहली 29 धावांवर नाबाद राहिला. यष्टिरक्षक ऋषभ पंतने चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला.

सोमवारी पहिला डाव 285 धावांवर घोषित झाला

उपाहारापूर्वी भारताने दुसऱ्या डावात बांगलादेशला 146 धावांत ऑलआउट केले. बांगलादेशी संघाने दिवसाची सुरुवात 26/2 अशी केली. सोमवारी भारताने पहिला डाव 34.4 षटकांत 9 बाद 285 धावांवर घोषित केला.

टीम इंडियाने बांगलादेशला पहिल्या डावात 233 धावांत गुंडाळले होते. पावसामुळे तिसऱ्या आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करावा लागला, तर पहिल्या दिवशी केवळ 35 षटके टाकता आली. अशा स्थितीत सामना जवळपास अनिर्णित मानला जात होता, परंतु भारतीय संघाने गेल्या 2 दिवसांत संपूर्ण चित्र उलटे केले.

भारताचा पहिला डाव कसा होता?

भारतीय संघाने सर्वांत वेगवान 50, 100 आणि 200 धावांचा विक्रम नोंदविला.भारताकडून यशस्वी जैस्वाल (72) आणि केएल राहुल (68) यांनी अर्धशतके झळकावली. विराट कोहली 47 धावा करून शकीब अल हसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 27 हजार धावाही पूर्ण केल्या. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने 4 आणि मेहदी हसन मिराजने 3 विकेट घेतल्या.

बांगलादेशच्या दुसऱ्या डावात काय घडलं?

कानपूर येथे खेळवण्यात येणाऱ्या भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावात 146 धावांवर सर्वबाद झाला. कसोटी मालिकेतील पाचव्या दिवसाच्या पहिल्याच सेशनमध्ये बांगलादेशचा संघ ढेपाळला. भारताकडून दुसऱ्या डावात जडेजा, अश्विन आणि बुमराह यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+