Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs AUS - ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारुण पराभव, ही आहेत पराभवाची चार कारणे

IND vs AUS- पिंक बॉल कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारताचा लाजिरवाना पराभव झाला. अँडिलेड येथे सुरु असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला फक्त अडीच दिवसांत लोळवले. भारताचा 10 गडी राखून पराभव करत ऑस्ट्रेलियाने या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात फक्त 19 धावांचे लक्ष मिळाले होते. ते त्यांनी सहज पूर्ण केले. हे लक्ष पूर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला फक्त चार षटके खेळावी लागली.

IND vs AUS

पत्त्याप्रमाणे कोसळली फलंदाजी

फलंदाजी हे भारताच्या पराभवाचे मुख्य कारण राहिले. भारताच्या सलामीच्या जोडीसोबतच मध्यम क्रमाचे फलंदाजही सपशेल अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर भारताच्या एकाही फलंदाजाला टिकाव धरता आला नाही. पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन्ही डावांत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली.

रोहित-विराटचा फ्लाँप शो

पहिल्या कसोटीत विराट कोहलीने शतक करत, आपण फार्ममध्ये आल्याचे दाखवले होते. मात्र हा फार्म त्याला दुसऱ्या कसोटीच टिकवता आला नाही. अॅडिलेड कसोटीत विराट कोहलीची बॅट शांत राहिली. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या बाँलवर विराटने पुन्हा एकदा आपली विकेट गमावली. कोहलीने पहिल्या डावात सात तर दुसऱ्या डावात फक्त अकरा धावा केल्या. रोहित शर्माचा फार्म हरवलेला दिसला. पहिल्या डावात त्याला फक्त तीन व दुसऱ्या डावात सहा धावा करता आल्या. दोन्ही डावात तो दोन अंकी धावसंख्याही गाठू शकला नाही.

कसा रंगला सामना?

पहिल्या डावात टीम इंडिया 157 धावांनी पिछाडीवर होती. भारतीय संघाला दुसऱ्या डावात 175 धावांपर्यंत मजल मारता आली. दुसऱ्या डावात भारताला केवळ 18 धावांची आघाडी मिळाली. भारताकडून नितीश रेड्डीने 42, ऋषभ पंतने 28, शुभमन गिलने 28 आणि यशस्वी जैस्वालने 24 धावा केल्या. विराट कोहली 11, केएल राहुल 7 आणि रोहित शर्मा 6 धावा करून बाद झाले. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने 5, स्कॉट बोलंडने 3 आणि मिचेल स्टार्कने 2 विकेट्स घेतल्या. भारताने दिलेले १९ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने सहज गाठले. उस्मान ख्वाजा आणि नॅथन मॅकस्विनी यांनी मिळून 22 धावा करत संघाला विजयापर्यंत नेले. ख्वाजा 12 धावांवर नाबाद राहिला आणि मॅकस्विनी 10 धावांवर नाबाद राहिला.

ॲडलेडचे मैदान भारतासाठी अपयशी

ॲडलेडमध्ये भारताचा हा सलग दुसरा पराभव आहे. या आधी डिसेंबर 2020 मध्ये ॲडलेडमध्ये टीम इंडियाचा शेवटचा पराभव झाला होता. त्यानंतर दिवस-रात्र कसोटीत कांगारूंनी जबरदस्त विजय मिळवला होता. ॲडलेडमध्ये टीम इंडियाची पराभवाची मालिका यावेळीही कायम राहिली. यावेळीही टीम इंडिया डे-नाईट टेस्टमध्ये जिंकू शकली नाही. या मैदानावर भारताचा शेवटचा विजय डिसेंबर 2018 मध्ये होता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+