IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 181 धावांवर आटोपला, भारताला इतक्या धावांनी आघाडी
IND vs AUS 5th Test Day 2: सिडनी येथे खेळल्या जात असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या होत्या. यानंतर ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या डावात केवळ 181 धावांवर ढेपाळला. पहिल्या डाव्यात 4 धावांची भारताला आघाडी मिळाली असून आता आपला दुसरा डाव खेळण्यासाठी मैदानात उतरण्यास सज्ज आहे.
जसप्रीत बुमराहने सामन्याच्या मध्यावर मैदान सोडले
या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत असून हा सामना रोमांचक वळणावर आला आहे. बुमराहच्या अनुपस्थितीत भारतीय वेगवान गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाच्या उर्वरित फलंदाजांना झटपट बाद केले. बुमराह हॉस्पिटलमध्ये गेल्यावर टीम इंडिया दडपणाखाली दिसली, पण बाकीच्या वेगवान गोलंदाजांनी आपल्या मेहनतीने सामना हाताळला आणि ऑस्ट्रेलियाच्या चार विकेट झटपट काढल्या.

फोटो सौजन्य- पीटीआय
विराट कोहलीने संघाचे नेतृत्व केले
जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत विराट कोहलीने कर्णधारपदाची धुरा सांभाळली. मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा यांनी चमकदार कामगिरी करत प्रत्येकी तीन बळी घेतले. तर नितीश रेड्डी आणि बुमराहने प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ अवघ्या 181 धावांवर गडगडला. भारतीय संघ आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल.
भारतीय गोलंदाजांची दमदार कामगिरी
आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने एका विकेटवर नऊ धावांनी सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. बुमराहने मार्नस लॅबुशेनला विकेटकिपर पंतकडे झेलबाद करून केवळ दोन धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर मोहम्मद सिराजने आपल्या गोलंदाजीने कहर केला. त्याने डावाच्या 12व्या षटकात सॅम कॉन्स्टासला 23 धावांवर बाद केले आणि त्यानंतर ट्रॅव्हिस हेडला चार धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सिराजच्या शानदार गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियासाठी काही कठीण झाले आणि त्यांनी लवकरच त्यांच्या डावातील उर्वरित विकेट गमावण्यास सुरुवात केली.












Click it and Unblock the Notifications