Ind Vs Pak : 16 वर्षांची प्रतिक्षा संपली; विराटच्या 82 व्या शतकाने केले 'हे' ही विक्रम, वाचा डिटेल्स
दुबईत खेळल्या गेलेल्या चॅम्पियन ट्राँफीच्या दुसऱ्या सामन्यात भारताने दिमाखदार विजय मिळवला. क्रिकेटच्या मैदानावर विराट कोहलीचे नाव नेहमीच एक उत्तम फलंदाज म्हणून घेतले जाते. आज पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटने शतक ठोकून पुन्हा एकदा ते बरोबर सिद्ध केले. त्याच्या शतकातून केवळ त्याच्या फलंदाजीचे कौशल्य दिसून येत नाही तर त्याने पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध आपली क्षमता सिद्ध केली आहे.

कोहलीने ठोकले ८२ वे शतक
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने नेहमीच तणावपूर्ण आणि रोमांचक असतात. या सामन्यात भारतासाठी धावा करणे आव्हानात्मक होते. कारण सुरुवातीला पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चांगली पकड ठेवली होती. भारताला जिंकण्यासाठी चांगल्या धावसंख्येची आवश्यकता होती आणि अशा परिस्थितीत विराट कोहलीने जबाबदारी स्वीकारली आणि शतकी खेळी केली. या सामन्यात विराट कोहलीने १११ चेंडूत नाबाद १०० धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान त्याने ७ चौकार मारले आणि त्याच्या खेळीमुळे भारतीय संघाला बळकटी मिळाली आणि संघाला विजयाकडे नेले.
१६ वर्षांची प्रतीक्षा संपली
विराट कोहली २००९ मध्ये पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी खेळला होता. पण या स्पर्धेत विराटने पहिल्यांदाच शतक झळकावले. म्हणजेच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक करण्यासाठी त्याला १६ वर्षे वाट पहावी लागली. त्याच वेळी २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर त्याने प्रथमच एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले आहे. याशिवाय, त्याने ५३१ दिवसांनंतर परदेशी भूमीवर एकदिवसीय शतक झळकावले आहे. म्हणजेच ही खेळी त्याच्यासाठी अनेक प्रकारे खास आहे.
'त्या' यादीत नंबर १
विराट कोहलीने आयसीसी एकदिवसीय स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध चौथ्यांदा ५० पेक्षा जास्त धावा केल्या. हाही एक विक्रमच आहे. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही खेळाडूला ही कामगिरी ३ पेक्षा जास्त वेळा करता आलेली नाही. विराट व्यतिरिक्त, व्हिव्ह रिचर्ड्स आणि सचिन तेंडुलकर यांनी पाकिस्तानविरुद्ध प्रत्येकी ३ वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. याशिवाय आयसीसी एकदिवसीय स्पर्धेत हा त्याचा २३ वा पन्नासपेक्षा जास्त स्कोअर राहिला. त्याच्याशिवाय फक्त सचिन तेंडुलकरला आयसीसी एकदिवसीय स्पर्धांमध्ये इतक्या वेळा पन्नास पेक्षा जास्त धावा करता आल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications