Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आम्ही यासाठी तयार नव्हतो, विराट-रोहितच्या निवृत्तीवर चाहते भावूक; दिग्गज म्हणतात…

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असा २९ जूनचा दिवस होता. कोट्यावधी क्रिकेट चाहत्यांना भारतीय संघाने शनिवारी अनेक आनंदाचे क्षण दिले. भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत ट्विट्वेंटी विश्वचषक आपल्या नावावर केला.

या विजयानंतर संपूर्ण देशभरात अक्षरश: दिवाळीसारखी आतिषबाजी करण्यात आली. लोकांनी रस्त्यावर येऊन नाचत, घोषणाबाजी करत आपला आनंद व्यक्त केला. या सर्व आनंदाच्या क्षणांमध्ये दोन बातम्या अशा होत्या की त्यामुळं भारतीय क्रिकेटचे चाहते प्रचंड भावूक झाले आहेत.

india won t20 world cup

दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांना पाठोपाठ ट्विट्वेंटी फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. दोघांच्या या निर्णयामुळं चाहते अतिशय भावनिक झाल्याच पाहायला मिळतय. चाहतेच नव्हे तर अनेक दिग्गज देखील या दोघांच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया देताना भावनिक झाले आहेत.

सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. विराट आणि रोहित भाई आम्ही या क्षणासाठी तयार नव्हतो, अशा शब्दांत अनेकांनी भावना व्यक्त केल्या आहेत. विराट आणि रोहितच्या योगदानाबद्दल चाहत्यांनी दोघा खेळाडूंचे आभार व्यक्त केले आहेत.

रोहित-विराटच्या निवृत्तीवर हार्दिक भावूक, म्हणाला..

हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ एएनआयने पोस्ट केला आहे, या व्हिडिओमध्ये तो हार्दिक म्हणाला की, "२०२६ साठी अजून बराच वेळ आहे. मी रोहित आणि विराट या दोघांसाठी खूप आनंदी आहे.

ते भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज आहेत. या क्षणासाठी ते पूर्णपणे पात्र आहेत. इतकी वर्षे त्यांच्यासोबत खेळणे खूप छान होते. पण अशा सर्वोच्च क्षणी आम्ही त्यांना निरोप देऊ शकलो ही अभिमानाची बाब आहे.

रोहित शर्माच्या T20I निवृत्तीनंतर हार्दिक पांड्याला T20 संघाचे पूर्णवेळ कर्णधारपद मिळू शकते. गेल्या वर्षी रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिकने संघाची जबाबदारी स्वीकारली होती. या विश्वचषकात तो संघाचा उपकर्णधारही होता.

रोहित शर्माचा कर्णधार म्हणून प्रवास कसा होता?

रोहित शर्माने 50 व्या विजयासह त्याची T20I कर्णधारपदाची कारकीर्द संपवली. या फॉरमॅटमध्ये विजयी अर्धशतक करणारा तो पहिला कर्णधार ठरला आहे. या यादीत त्याच्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आहे, ज्याने आपल्या कार्यकाळात संघाला 48 सामने जिंकून दिले आहेत.

निवृत्तीनंतर विराटची इन्स्टाग्राम पोस्ट

विराट कोहलीने T20 विश्वचषक फायनल जिंकल्यानंतर इंस्टाग्राम पोस्टद्वारे देवाचे आभार मानले. यापेक्षा चांगल्या दिवसाचे स्वप्न पाहू शकत नाही, असे त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. देव महान आहे आणि मी कृतज्ञतेने माझे डोके टेकवतो. शेवटी आम्हाला जे हवे ते आम्ही मिळवलेच. जय हिंद

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+