डिजीटल स्ट्राईक : शोएब, बाबर, रिझवानचे इन्स्टा अकाऊंट बंद; पाकिस्तान लिगचं स्ट्रिमिंगही थांबवलं
जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथे २२ एप्रिलला दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही देशांत सध्या चांगलाच तणाव पहायला मिळत आहे. भारताने अनेक कठोर निर्णय घेतल्यानंतर आता पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर डिजीटल स्ट्राईक केला. पाकिस्तान सुपर लीगचे भारतातील स्ट्रिमिंग थांबविण्यात आल्यानंतर आता स्टार पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे इन्स्टा, यू-ट्युब चॅनल्स बंद करण्यात आले आहे.

इन्टा अकाऊंटवर घातली बंदी
पाकिस्तानचा क्रिकेटपटू बाबर आझम, शाहीन अफ्रिदी, मोहम्मद रिझवान यासह सर्व पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. त्याता मोठा फटका या क्रिकेटपटूंना बसणार आहे. त्यांचे फोलोअर्स कमी होऊन त्यांचा रिचही कमी होणार आहे. कारण भारतातून या क्रिकेटपटूंना लाखोंच्या संख्येने फाँलो करण्यात आलं होतं.
१६ यूट्यूब चॅनेल्सवर बंदी
भारताने केवळ या खेळाडूंचे इन्स्टाग्राम अकाऊंट बंद केलेले नाहीत तर त्यांचे युट्यूब चॅनल्सही बंद करण्यात आले आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याचे युट्यूब चॅनल्सही भारतात बंद करण्यात आले आहे. भारताने याआधी पाकिस्तानमधील एकूण 16 यूट्यूब चॅनेल्स भारतात बंद करण्याचा निर्णय घेतला. डॉन न्यूज, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, जेओ न्यूज यासारखी यूट्यूब चॅनेल्स भारताने बंद केली आहेत. या प्रकारामुळे या क्रिकेटपटूंना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.
पंतप्रधानांचेही यूट्यूब चॅनेल बंद
भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचेही यूट्यूब चॅनेल भारतात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भारताने थेट पाकिस्तानी पंतप्रधानाविरोधातही कारवाई केल्याचं म्हटलं जात आहे. भारताने पाकिस्तानातील काही अभिनेते आणि अभिनेत्रींची इन्स्टाग्राम खातीही भारतात बंद केली आहेत. हानिया आमीरचाही यात समावेश आहे. माहिरा खान हिचेही इन्साटाग्राम खाते भारतात बंद करण्यात आले आहे. यासह सनम सईद, अली जफर यांचेही इन्साटाग्राम खाते भारतात बॅन करण्यात आले आहे.
पाकिस्तान दिवाळखोरीत जाईल
पीएसएलचे लाईव्ह स्ट्रीमिंग थांबल्यानंतर पाकिस्तान दिवाळखोर होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. एवढेच नाही तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने आयसीसीकडे भारत आणि पाकिस्तानला स्पर्धांमध्ये एकाच गटात ठेवू नये अशी मागणी केली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मोठ्या सामन्यांमधून पाकिस्तानला मोठा नफा मिळतो आणि हे थांबवण्यासाठी योजना आखल्या जात आहेत.












Click it and Unblock the Notifications